- रिअल माद्रिदवर सरळ 4-0 ने विजय
मॅन्चेस्टर,
Manchester City मॅन्चेस्टर सिटीने रिअल माद्रिदवर सरळ 4-0 गोलने विजय नोंदवून युईएफए चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयाबरोबरच पेप ग्वार्डियेला यांनी तिसर्यांदा चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकण्याच्या दिशेने आपली आगेकूच कायम राखली आहे. इतिहाद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मॅन्चेस्टर सिटीने संपूर्ण वेळ रिअल माद्रिद संघावर वर्चस्व गाजविले. उभय संघादरम्यानचा उपांत्य फेरीचा सामना 1-1 गोलने बरोबरीत राहिला होता. आता मॅन्चेस्टर सिटी इतिहास रचण्यापासून तीन सामने दूर आहे.
पूर्वार्धात बर्नार्डो सिल्व्हाने दोन गोल नोंदवून Manchester City मॅन्चेस्टर सिटीला जबरदस्त सुरुवात करून दिली. मध्यंतरानंतर एडर मिलिटाओने आत्मघाती गोल केला व बदली खेळाडू ज्युलियन अल्वारेझने वेळेत मारा करून एकूण 5-1 असा विजय मिळविला. गत युरोपियन चॅम्पियन्स रिअल माद्रिदवर मात केल्यानंतर आता मॅन्चेस्टर सिटी आगामी 10 जून रोजी इस्तंबूलमध्ये अंतिम सामन्यात इंटर मिलानविरुद्ध अशीच कामगिरी करण्यास उत्सुक असेल.