अकोला दंगल...'इन्स्टाग्राम’ वरील 'ते' संभाषण कोणी पसरविले?

दंगलीचा खरा सूत्रधार कोण ?; शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन

    दिनांक :19-May-2023
Total Views |
अकोला,
Akola riots 'इन्स्टाग्राम’ वरील संवादात धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत जुने शहर परिसरात 13 मे रोजी रात्री उशिरा विशिष्ट समाजाच्या समाजकंटकांनी हिंसाचार करून धुडघूस घातला. सुरुवातीला रामदासपेठ पोलिस स्टेशन येथे तक्रारीकरिता मोठा जमाव जमला होता. तेथून हा जमाव घोषणा देत जुने शहरात पोहोचून तेथे त्यांनी अक्षरशः हिंसक धिंगाणा घातल्याचे चित्र होते. मात्र, मुळात धार्मिक भावना दुखविणारा मजकूर समाजमाध्यमावर पसरविला कोणी असा प्रश्न उपस्थित करीत दंगलीच्या खर्‍या सूत्रधाराला अटक करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
 

akolaj 
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरून दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर संवाद सुरू झाला. हा संवाद काही वेळातच विसंवादात रुपांतरित झाला. त्या विसंवादाच्या केवळ दोघांमध्ये असलेल्या संभाषणाचे मोबाईल ‘स्क्रीन शॉट’घेऊन पसरविण्यात आले. त्यामुळेच भावना भडकल्या अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. Akola riots ‘स्क्रीन शॉट’वाचून मोठा जमाव रामदासपेठ पोलिस ठाण्यासमोर एकत्र आला. या जमावाने तेथे तक्रार दाखल केली. नंतर येथे जमलेला जमाव खुलेनाट्यगृह, शहर कोतवाली, जयहिंद चौक, जुने शहर पोलिस स्टेशनमार्गे जुन्या शहरातील हरिहरपेठ येथे पोहोचला आणि तेथे या जमावाला आणखी काही गट येवून मिळाले. जमलेल्या समाजकंटकांच्या जमावाने दिसेल त्या वाहनावर, लगतच्या घरांवर हल्ला चढविला. तुफान दगडफेक केली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर पोलिसांसह 8 जण जखमी झाले. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूरासह हवेत गोळीबार करावा लागला. त्यानंतर संचारबंदी लावण्यात आली.
  
ह्या सर्व हिंसाचाराला इन्स्टाग्रामवर दोन व्यक्तींमध्ये असलेला संवाद पसरविण्याचे निमित्त झाले. मात्र, मुळात दोघांमध्ये असलेल्या संवादात भावना दुखवली असेल तर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करता आली नसती का ? त्यासंवादाचे ‘स्क्रीन शॉट’ काढून ते समाजमाध्यमावर पसरविण्याचा संबंधिताचा उद्देश काय होता या प्रश्नांच्या उत्तरात दंगलीचा मूळसूत्रधार लपला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. Akola riots धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाच असू नये ज्याने धार्मिक भावना दुखावल्या त्याच्यावर कारवाई व्हावीच. पण ज्यांनी हे निमित्त साधून शहरात अराजकता पसरविली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, यासर्व घटनेची सखोल चौकशी सुरु असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी जातीय सलोखा कायम ठेवत शांतता राखवी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
काही वेळातच पेट्रोल, फटाके, शस्त्रास्त्र कसे जुळविले
Akola riots दंगलखोरांनी दंगलीत मोठ्या प्रमाणात दगड, विटा यासह पेट्रोल, घातक फटाके आणि शस्त्रास्त्रांचा वापर केल्याची चर्चा आहे. अगदी काही वेळातच हे विध्वंसक
साहित्य एकत्र कसे, कोठून केले गेले  असा प्रश्न दंगलग्रस्त परिसरातील पीडितांना पडला असून आहे, तर पोलीस याघटनेचा बारकाईने तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.