नवी दिल्ली,
National Highway : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते बांधणीचा नवा विक्रम केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अवघ्या 100 तासांत 100 किमीचा द्रुतगती मार्ग बांधण्याचा विक्रम केल्याची माहिती नुकतीच परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. हा एक्स्प्रेस वे गाझियाबाद ते अलीगढ दरम्यान बांधण्यात आला आहे, ज्याचे एकूण अंतर 118 किमी आहे. हा एक्सप्रेसवे दादरी, नोएडा, सिकंदराबाद, बुलंदशहरबी आणि खुर्जा सारख्या ठिकाणांना जोडण्याचे काम करतो. हा रस्ता व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
राष्ट्रीय महामार्ग (National Highway) भारतातील प्रमुख शहरांना जोडण्याचे काम करतात, ज्यामुळे दोन शहरांमधील वाहतूक सुलभ होते. चांगले रस्ते हे आर्थिक विकासाचे साधन असून द्रुतगती मार्ग बनवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. हा द्रुतगती मार्ग कोल्ड सेंट्रल प्लांट रीसायकलिंग तंत्रज्ञानाने तयार केला जात आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला यश आले आहे. हा 6 लेन एक्स्प्रेस वे आहे ज्यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
हा 100 किमीचा एक्स्प्रेस वे तयार करण्यासाठी 80,000 कामगार आणि 200 रोड रोलर्स कामाला लागले आहेत. (National Highway) नवे महामार्ग बनवताना रेकॉर्ड तयार करणे, ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी नवीन गोष्ट नाही, याआधीही एनएचएआयने नोंदी केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वी अमरावती ते अकोला दरम्यान 105 तास 33 मिनिटांत 75 किलोमीटरचा विक्रम केला होता. आता NHAI ने 100 तासात 100 किलोमीटरचा एक्स्प्रेस वे बनवला आहे.
या संदर्भात परिवहन मंत्र्यांनी (Nitin Gadkari) ट्विट केले की, "हे यश भारताच्या (National Highway) रस्ते बांधकाम क्षेत्रातील अथक परिश्रमाचे यश म्हणून पाहिले पाहिजे. हा रस्ता लोकांच्या प्रवासासाठी आणि माल वाहतुकीसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामध्ये 90% मिल्ड मटेरियल वापरण्यात आले आहे, ज्यामध्ये सुमारे 20 लाख चौरस मीटर रस्त्याचा पृष्ठभाग तयार केला जाऊ शकतो. यासह, व्हर्जिन मटेरियलचा वापर केवळ 10% करण्यात आला आहे."