दारूड्या पित्याची मुलगा व पुतण्याने केली हत्या

स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा

    दिनांक :21-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
दारूड्या पित्याच्या जाचाला कंटाळून मुलाने चुलत भावाच्या मदतीने पित्याची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिला. परंतु, (crime branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात या घटनेचा उलगडा केला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शनिवार, 20 मे रोजी धामणगाव रेल्वे तालुक्यातील तरोडा येथील पोलिस पाटील माधुरी जगताप यांनी कुर्‍हा पोलिस ठाण्यात प्रभाकर जगताप यांच्या शेतात अज्ञात इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली होती.
 
crime branch
 
मृतदेहाच्या पोटावर, कमरेवर, पायावर धारदार शस्त्राचे वार दिसत असल्याचीही माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन (crime branch) पोलिस अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील श्रेणी पोलिस उप निरीक्षक मुलचंद भांबुरकर यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते. 20 मे रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मृतकाची ओळख पटविण्याकरिता फोटो व्हायरल केले होते. दरम्यान पथकाला सदर मृतकाचे नाव सतीश गंगाधर कुरटकार असे असल्याची व यवतमाळ जिल्ह्याच्या खडकसावंगा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली होती. त्याचा हल्लीचा मुक्काम धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथील होता.
 
 
38 वर्षीय सतीश कुरटकार हा जळगाव आर्वी येथील जावाई होता, अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्याची पत्नी व परिवारास भेटून माहिती घेतली. सतीशने 19 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या (crime branch) दरम्यान घरगुती वादावरून पत्नी व मुलांना दारू पिऊन मारहाण केली, तसेच तो नेहमीच कुटुंबाला दारू पिवून मारहाण करीत असल्याने मुलगा अभी कुरटकार हा त्रस्त झाला होता. तसेच त्याने भावाच्या पत्नीलाही मारहाण केली असल्याचे सांगण्यात येत होते. नेहमीचा त्रास असह्य झाल्याने सतीश कुरटकारचा 19 वर्षीय मुलगा अभी कुरटकार व पुतण्या 19 वर्षीय यश जगदीश कुरटकार यांनी सतीशला काहीतरी कारण सांगून कॅनॉलच्या रस्त्याने एका शेतात नेऊन कोणत्यातरी शस्त्राने जिवानीशी ठार मारले. पुढील तपास कुर्‍ह्याच्या ठाणेदार गीता तांगडे करीत आहे.