दररोज तीन लीटर मानवी दुधाचे संकलन

-डागा रूग्णालयात पहिलीच मानवी दूध बँक
- जागतिक मानवी दूध दान दिन

    दिनांक :21-May-2023
Total Views |
नागपूर, 
जन्मजात गंभीर आजारी (Milk Donation Day) किंवा अकाली जन्मलेल्या बाळांना सुरक्षित आईचे दूध मिळावे, बाळांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने राज्य शासनाच्या सहकार्याने डागा रूग्णालयात पहिलीच मानवी दूध बँक तयार करण्यात आली. या बँकेत दररोज तीन लिटर मानवी दुधाचे संकलन केले जाते.
 
Milk Donation Day
 
आईच्या दुधामुळे (Milk Donation Day) बाळाला त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यांत आवश्यक सर्व पोषण मिळते. मात्र, काही मातांना दूध येत नाही. अशा मातांच्या बाळांना बँकेत साठविलेले मानवी दूध उपयोगी पडते. डागा रूग्णालयात 42 बेडचे विशेष शिशू दक्षता कक्ष आहे. याठिकाणी कमी वजनाचे, कमी दिवसाचे बाळ, जन्मताच न रडलेले बाळ आणि ज्यांना इन्फेक्शन झाले, अशा बाळांना या कक्षात ठेवले जाते. त्यांना दर दोन तासांनी दुधाची गरज पडते. दर वेळी बाळाची आई येऊ शकत नाही. अशा बाळांना साठवलेले दुध संजिवनी ठरत आहे.
 
 
आधी बाळांना पावडरचे दूध (Milk Donation Day) दिले जायचे. त्यामुळे बाळांना जास्त दिवस रुग्णालयात राहावे लागत होते. आता आईचेच दूध मिळत असल्याने त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पालकांचा रुग्णालयातील खर्च कमी होतो. पर्यायाने वेळ आणि पैसाही वाचतो. त्यामुळे मानवी दूध बँक वरदान ठरत आहे. डॉ संजय देशमुख म्हणाले, न्यू एरा मिल्क बँक सुविधा, कोणत्याही स्तनदा मातेने संमती दिल्यानंतर आणि योग्य चाचण्या घेतल्यानंतर त्यांच्या स्तनाचे दूध दान करू शकतात.
मागणी 2 ते 3 लीटरची, 3 महिने साठवणक्षमता
रुग्णालयात रोज 50 महिलांची प्रसुती होते. काही मातांना भरपूर दुध (Milk Donation Day) असते. बाळाचे पोट भरल्यानंतरही दुध उरते. मातांच्या छातीत दुधाचे प्रमाण जास्त झाल्यास त्यांना त्रास होतो. अशा वेळी त्यांचे समुपदेशन करून निरोगी मातांकडून दूध घेतले जाते. त्याची स्क्रीन, चाचणी केल्यानंतर मानवी दूध बँकेत संग्रहित केले जाते. रोज दोन ते तीन लीटर दुधाची मागणी आणि तेवढाच पुरवठा केला जातो. सहा महिने साठवून ठेवता येईल, अशी बँकेची क्षमता आहे. यासाठी प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर काम करतात.
- डॉ. सीमा पारवेकर, अधीक्षक, डागा रूग्णालय
खाजगी रूग्णालयात पहिली बँक
छत्रपती चौकातील न्यू एरा मदर अ‍ॅण्ड चाइल्ड हॉस्पिटलने नुकतीच मातांसाठी नागपूरची पहिली खाजगी मानवी (Milk Donation Day) दूध बँक सुविधा सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या शिफारशींचे पालन करून आईचे दूध उपलब्ध नसताना सर्वोत्तम पर्याय म्हणून दान केलेले स्तन दूध प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
- डॉ आनंद भुतडा, संचालक, न्यू एरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल