अकोला,
'आले प्रशासनाच्या मना तेथे कोणाचे चालेना' याचा प्रत्यय आज 22 मे रोजी येथील (Canal route encroachment) जुन्या शहरातील कॅनॉल मार्गावरील अतिक्रमण हटविताना नागरिकांना आला. जवळपास 30 वर्षांपूवी येथील रेणुकानगर मागील कॅनॉल बंद झाल्यानंतर कॅनॉल लगत अनेकांनी गुंठेवारीच्या भूखंडावर अतिक्रमण करून नियमांच्या विरोधात घरे बांधली. त्या सर्व अतिक्रमणावर आज मनपाची जेसीबी चालली. यात किमान 75 अशा अतिक्रमित घरांना जमीनदोस्त करण्यात आले आहे.
दोन्ही प्रशासनाने केलेल्या (Canal route encroachment) जोरदार कारवाईत मोळके वाडी, गुडवाले प्लॉट, हमजा प्लॉट, साई नगर, शिवसेना ऑटो स्टॉप, नटराज चौक, अहमद कॉलनी या भागातील कालव्याच्या दोन्ही बाजूची 75 पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त करण्यात आली. तसेच शासकीय जागेतील संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, टिनशेड आदी काढण्यात आले. कॅनॉलच्या दोन्ही बाजूकडील शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणावर सोमवार, 22 मे रोजी जेसीबीचा तडाखा लगावण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई जिल्हा प्रशासन, व मनपा प्रशासनाने संयुक्तपणे केली. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या अशांतीमुळे यावेळी कोणतीही अनुचित घटना होवू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या (Canal route encroachment) भागातील कालवा हा 1990 च्या पूर्वीच बंद करण्यात आला.या भागातील शेतीचे अनेकांनी भूखंड पाडल्यानंतर येथे रेणुका नगर आणि आश्रय नगरात भरपूर वस्ती झाली व आतातर थेट रेल्वे गेटपर्यंत वसाहती झाल्या आहेत.त्यामुळे कालवा हा कामात नव्हता. कालवा बंद झाल्यावर अनेकांनी या जागेवर अतिक्रमण केले.त्यात शिवसेना वसाहती पासून ते अहमद कॉलनी या दरम्यान शासकीय जागेवर अनधिकृतपणे कच्ची तसेच पक्की घरे बांधण्यात आली होती. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी ही कारवाई सुरु झाल्यापासून तो ती पूर्णपणे संपे पर्यंत आपली हजेरी लावली. इतर अधिकार्यांनी आपल्या कामानुसार उपस्थिती दर्शविली.अधिकारी हजर असल्यामुळे मनपाचे संबंधित विभागाचेही अधिकारी व कर्मचारी हजर होते.
अवैध नळजोडण्या तोडल्या
येथे (Canal route encroachment) अतिक्रमण करणार्यांनी कालव्याच्या खालून पाईप टाकून दुसर्या बाजूने अवैधरीत्या नळजोडण्या घेतल्या होत्या. अनेक वर्षापासून या अवैध नळजोडण्यातून पाण्याचा लाभ ही मंडळी घेत होती. मात्र आज या कारवाईत या अवैध नळजोडण्या तोडण्यात आल्या.
तगडा पोलिस बंदोबस्त
ज्या (Canal route encroachment) भागात प्रशासनाने ही जोरदार कारवाई केली तो भाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच कारवाई दरम्यान काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, मनपाचे शेकडो कर्मचारी आणि तेवढाच तगडा पोलिस बंदोबस्तामुळे ही कारवाई शांततेत पार पडली.