समारंभात नाचताना जनरेटरमध्ये अडकले मुलीचे केस

23 May 2023 17:40:01
प्रयागराज,
Hair got Stuck : लग्न आणि धार्मिक समारंभात महिला असो किंवा किशोरवयीन मुली, सुंदर दिसण्यासाठी त्या आपले लांब केस खुले ठेवतात. महिला आणि मुलींचे मोकळे केस केवळ त्यांचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर कधी कधी त्यांचा जीवही धोक्यात घालू शकतात. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील एका गावात समोर आली आहे. ज्यामध्ये एका 16 वर्षीय मुलीचा डीजेच्या तालावर कार्यक्रमात नाचत असताना तिच्या मोकळ्या केसांमुळे तिचा जीवघेणा अपघात झाला.
 
Hair got Stuck
 
प्रयागराजमधील सैदाबादमध्ये ही हृदयद्रावक घटना घडलेली आहे. डान्स करताना मुलीचे केस तिच्या जवळ असलेल्या जनरेटरमध्ये अडकले. (Hair got Stuck) काही सेकंदात जनरेटरमुळे तिची त्वचा आणि केसही फाटले. या अपघातात मुलगी काही वेळातच रक्ताच्या थारोळ्यात पडली. अपघातानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्यातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी ताबडतोब टाके लावले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 16 वर्षीय मुलीला अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आणण्यात आले होते, डॉक्टरांनी तिच्या जखमेवर सुमारे 700 टाके लावले आहेत. डोक्यावरील केस ओढले गेल्याने त्वचा फाटली, डोक्यावरील केस पूर्णपणे गायब झाले. मुलीच्या डोक्याला टाके लावून रक्तस्त्राव थांबवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीची जखम बरी होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.
 
 
स्थानिक वृत्तानुसार, सैदाबादमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात दिवे, पंखे लावण्यासाठी जनरेटरचा वापर करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला व मुली डीजेच्या तालावर धार्मिक गाणी वाजवत नाचत होत्या. त्यामुळे नाचण्यात मग्न असलेली १६ वर्षीय तरुणी जनरेटरजवळ आली. त्यानंतर या (Hair got Stuck) अपघातामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला होता. या अपघातात बळी पडलेली 16 वर्षीय तरुणी लगेचच बेशुद्ध पडली. मुलीला प्रयागराज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेथे सीटी स्कॅन केले जात आहे. मुलीला हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलगी लवकर बरी व्हावी यासाठी मुलीचे कुटुंबीय प्रार्थना करत आहेत.
Powered By Sangraha 9.0