विश्व मांगल्य सभेची विदर्भ प्रांत बैठक

23 May 2023 21:03:43
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
विश्व मांगल्य सभेची (Vishwa Mangalya Sabha) विदर्भ प्रांत वार्षिक त्रिदिवसीय बैठक सभाचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत अमरावतीमध्ये 12 ते 14 मे दरम्यान झाली. भारत वर्षातील आदिशक्ती स्वरूप प्रत्येक परिवारामध्ये मातृवर्गाने परंपरा, वंश, धर्म , संस्कृती, राष्ट्र यांबद्दल वैचारीक दृष्टीकोन निर्माण करावा. संतान निर्मिती ही पालकांवरील सर्वात मोठी जबाबदारी आहे, असा उपदेश महाराजांनी यावेळी दिला.
 
Vishwa Mangalya Sabha
 
बैठकीकरिता (Vishwa Mangalya Sabha) संपूर्ण विदर्भातून 60 सक्रीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी विदर्भ प्रांत कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणींची घोषणा करण्यात आली. विश्वमांगल्य सभेच्या मातृनिर्माण कार्याचे दृढीकरण व या सर्वांच्या उपस्थितीत तीन दिवसांत वेगवेगळ्या सत्रांतून कार्यविस्तार, कार्यदृढीकरण व विविध कार्यविभाग यासारख्या विषयांवर चर्चा व संवाद साधला गेला. बैठकीच्या विविध सत्रांना राष्ट्रीय संगठन मंत्री डॉ. वृषाली जोशी, राष्ट्रीय सहसंगठन मंत्री गायत्री लोमटे, विदर्भ प्रांत संगठन मंत्री तेजसा जोशी, प्रांत संरक्षक माधुरी चेंडके यांनी संबोधित केले. यावेळी विदर्भ प्रांत अध्यक्ष मधुरा लेंधे यांनी उपस्थित समस्त मातृशक्तीच्या वतीने कार्यप्रणालीनुसार कार्य करत राहण्याचे आश्वासन वरिष्ठ पदाधिकार्‍यांना दिले. सभाचार्य आणि सभाचार्या यांच्या अमूल्य मार्गदर्शनातून संपूर्ण विदर्भातून अंबानगरीत आलेल्या कार्यकर्त्यांना अविरत कार्यमग्न राहण्याकरता ऊर्जा, शक्ती, प्रेरणा मिळाली. विश्वमांगल्य सभेचे मंगल कार्य समस्त भारतवर्षात अखंड प्रवाहीत ठेवण्याचा निश्चय यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी मिळुन केला.
 
Powered By Sangraha 9.0