विज्ञान भारती विदर्भ प्रदेशने राष्ट्रीय पातळीवर मारली बाजी

vidyarthi vidnyan manthan अमरावतीची अनुवा प्रसाद द्वितीय

    दिनांक :23-May-2023
Total Views |
नागपूर,
 
vidyarthi vidnyan manthan विज्ञान प्रसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार, एन.सी.ई.आर.टी. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 'विद्यार्थी विज्ञान मंथन' ही उच्चस्थ प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात येते. संपूर्ण राज्यभरातून यावर्षी 15000 हून जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. vidyarthi vidnyan manthan त्यातून विदर्भातील केवळ सात विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी निवड झाली होती. तिरुवनंतपुरम येथे 20 आणि 21 मे दरम्यान झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अमरावतीच्या दिल्ली पब्लिक स्कूलची सहाव्या वर्गातील विद्यार्थिनी अनुवा प्रसाद हिने संपूर्ण भारतातून सहाव्या इयत्तेतील द्वितीय स्थान प्राप्त करून संपूर्ण राज्याचा नावलौकिक वाढविला आहे. vidyarthi vidnyan manthan
 
 
 
vidnyan
 
 
vidyarthi vidnyan manthan तिला 15000 रुपये रोख पारितोषिक, मानपत्र आणि स्मृतचिन्ह देऊन मुख्य अतिथी डॉ. संजय बेहरे आणि आयआयएसइआरचे (IISER) डेप्युटी डायरेक्टर डॉ. एस. मूर्ती यांच्या हस्ते गौरवण्यात आले. विदर्भ प्रदेशतर्फे दरवर्षी विजेत्या विद्यार्थ्यांना सृजन इंटर्नशिप दिली जाते; ज्या अंतर्गत ते कुठल्याही एखाद्या राष्ट्रीय स्तरावरील प्रयोग शाळेत एक आठवडा मार्गदर्शन घेऊ शकतात तसेच नॅशनल अवॉर्ड म्हणजेच हिमालयन अवॉर्ड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर मासिक रोख रक्कम भास्करा शिष्यवृत्तीच्या रूपात मिळते. vidyarthi vidnyan manthan विज्ञान भारती, विदर्भ प्रदेशतर्फे राज्य समन्वयक म्हणून गिरीश जोशी आणि श्रीमती वसुंधरा साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेदरम्यान या वर्षीची प्रज्ञा शोध परीक्षा म्हणजेच विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेची नोंदणी सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. vidyarthi vidnyan manthan तथापि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी व्हावे तसेच विदर्भ प्रदेश च्या प्रतिनिधींशी त्वरित संपर्क करावा, असे आवाहन विज्ञान भारतीतर्फे सर्व शाळा प्रमुख, विद्यार्थी तसेच पालकांना करण्यात आले.
 
 
या स्पर्धेत भारतभरातून प्रत्येक राज्य पातळीवर पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले, एकूण 333 विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्या vidyarthi vidnyan manthan प्रथितयश स्पर्धेचे मूल्यमापन लेखी परीक्षा, मुलाखत, कौशल्य परीक्षण इत्यादी प्रकारे केले गेले. त्यातून पूर्व- पश्चिम - उत्तर आणि दक्षिण या चारही प्रभागातून प्रत्येकी तीन विद्यार्थी निवडले गेले. या व्यतिरिक्त प्रत्येक इयत्तेतील राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट तीन अशा 18 विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. अनुवाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
सौजन्य : नरेश चाफेकर, संपर्क मित्र