'टायगर नागेश्वर राव'चा फर्स्ट लूक रिलीज!

24 May 2023 18:22:58
मुंबई,  
'Tiger Nageshwar Rao' तेलुगू अभिनेता रवी तेजा याचा आगामी चित्रपट टायगर नागेश्वर रावचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर येताच चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. हा चित्रपट पॅन इंडिया अंतर्गत प्रदर्शित होणार आहे. आज निर्मात्यांनी टायगर नागेश्वर रावचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आयकॉनिक हॅवलॉक ब्रिजवर चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे. द काश्मीर फाइल्स या सर्वात लोकप्रिय चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी याची निर्मिती केली आहे.
 

dtr  
 
 
 
हा चित्रपट 1970 च्या दशकावर आधारित आहे 'Tiger Nageshwar Rao' त्याच्या फर्स्ट लूक पोस्टमध्ये रवी तेजा वाघासारखा गर्जना करताना दिसत आहे. निर्मात्यांनी रवी तेजाला भारतातील सर्वात मोठा चोर असे वर्णन केले आहे. वामसीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पिरियड चित्रपट कुख्यात चोर टायगर नागेश्वर रावच्या जीवनावर आधारित आहे.  बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमने याच्या हिंदी व्हर्जनला आपला आवाज दिला आहे. फर्स्ट लूकचा हा व्हिडिओ शेअर करताना निर्माता अभिषेकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "बॉलिवुडचा हँडसम हंक जॉन अब्राहम टायगर नागेश्वर रावला त्याच्याच आवाजात हिंदीत सादर करणार आहे. 24 मे रोजी फर्स्ट लूक." या पोस्टसोबतच त्याची रिलीज डेटही समोर आली आहे.
Powered By Sangraha 9.0