दुबईसारखेच अयोध्येच्या शरयू नदीत चालणार क्रूझ

24 May 2023 17:48:47
अयोध्या, 
भगवान श्री रामांची नगरी अयोध्या (Ayodhya Sharyu river) सजवली जात आहे. येथील मठ आणि मंदिरांचा जीर्णोद्धार केला जात आहे. त्रेता युगातील अयोध्या नगरीचे स्वप्न साकार होत आहे. धार्मिक दृष्टिकोनासोबतच अयोध्येचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही विकास केला जात आहे. यातच आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, आता शरयू नदीत पर्यटकांना पुष्पक विमानाचा आनंद लुटता येणार आहे. दुबईच्या धर्तीवर शरयूमध्येही क्रूझ चालवण्याची तयारी सुरू आहे.
 
Ayodhya Sharyu river
 
दुबईतील मरीनच्या धर्तीवर (Ayodhya Sharyu river) अयोध्येत क्रूझ ऑपरेशन करण्याची योजना पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात येईल. या क्रूझची खास गोष्ट म्हणजे, यात अत्याधुनिक सुविधा असतील. अयोध्येत येणारे पर्यटक आणि भाविक क्रूझमध्ये राहण्यासोबतच शरयूच्या प्रवाहात विविध पदार्थांचा आस्वाद घेतील. ही क्रूझ नया घाट ते गुप्तर घाटापर्यंत सुमारे 15 किलोमीटरच्या परिसरात चालवली जाईल. एकावेळी दीडशे पर्यटक बसून त्याचा आनंद घेऊ शकतील. यात आठ ते बारा खोल्या असतील. या क्रूझमध्ये पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध असतील. प्रत्येक सहलीत 15 मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल.
 
 
याशिवाय (Ayodhya Sharyu river) क्रूझमध्ये प्रवास करणार्‍या पर्यटक आणि भाविकांना ऑडिओ आणि व्हिडीओद्वारे अयोध्येतील संस्कृती आणि सभ्यतेची ओळख करून दिली जाईल. भगवान रामाच्या जीवनावर आधारित लघुकथेचेही वर्णन केले जाईल; जेणेकरून देशातील आणि जगातील लोकांना भगवान रामाची संस्कृती आणि सभ्यता, अयोध्येची माहिती व्हावी. दीपोत्सवापर्यंत अयोध्येत येणार्‍या पर्यटकांसाठी ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले.
 
 
पर्यटन विभागाचे उपसंचालक आरपी यादव यांनी सांगितले की, दोन कंपन्या (Ayodhya Sharyu river) अयोध्येत आल्या असून, त्या क्रूझ तयार करीत आहेत. नवीन घाटाजवळ पर्यटन विभागाच्या दोन एकर जागेवर ही क्रूझ बांधण्यात येणार आहे. त्यामुळे दुबईच्या धर्तीवर पर्यटकांना अयोध्येत क्रूझचा आनंद लुटता येणार आहे. याशिवाय त्यात नैसर्गिक देखावे दाखवण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर, अयोध्येतील पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. भविष्यात या योजनेच्या माध्यमातून रोजगारही मिळणार आहे. अयोध्येला धार्मिक महत्त्वाशिवाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही ओळखले जावे, अशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इच्छा आहे.
Powered By Sangraha 9.0