चांदूर बाजार नगर पालिकेत अनेक पदे रिक्त

- उपमुख्यमंत्र्याकडे पदे भरण्याची मागणी

    दिनांक :24-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
चांदूर बाजार, 
मुख्याधिकार्‍यासाठी शापित असलेल्या चांदूर बाजार नगरपालिकेत (Municipal Corporation) मुख्याधिकारी समवेत अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याने कर्मचारीविना नागरिकांचे प्रशासकीय कामे वेळेपूर्वी पूर्ण होत नाही. नागरिकांचा नगरपालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष वाढला आहे. अशातच नागरिकांच्या कामाला प्राधान्य देण्याकरिता पालिकेतील रिक्त पदे तात्काळ भरा ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचे माजी नगरसेवक गोपाल तीरमारे यांनी सांगितले.
 
Municipal Corporation
 
नगर पालिकेचा (Municipal Corporation) प्रशासकीय कारभार पारदर्शक व गतिमान करण्याकरिता चांदूर बाजार नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यासह नगर अभियंता, बांधकाम अभियंता, नगर रचनाकार, लेखापाल, अग्निशमन अधिकारी, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभागातील पदे, इत्यादी अनेक महत्वाची पदे भरणे आवश्यक आहे. महत्त्वाची पदे रिक्त असल्याने नागरिकांचे कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे. घरकुल योजनेसह अनेक योजना ह्या थंड बस्त्यात आहे.
 
 
(Municipal Corporation) बांधकाम विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने बांधकाम विभागातील विकास कामे ही दर्जाहीन व मनमानी पद्धतीने होऊन त्याठिकाणी भ्रष्टाचार वाढीस लागला आहे. सोबतच कर विभागातील व पाणीपुरवठा विभागातील कर वसुलीची थकबाकी वाढली आहे. त्याचा विकास कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे कार्यालयाची शिस्त बिघडली असून कामाचा वेग मंदावला आहे. छोट्या मोठ्या कामाकरिता सर्वसामान्यांना नगरपालिकेत नागरिकांना फेर्‍या माराव्या लागत आहे. पालिकेचा कारभार पारदर्शक व गतिमान करण्याकरिता रिक्तपेद तातडीने भरावी, अशी मागणी गोपाल तिरमारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.