फारूक अब्दुल्ला म्हणाले...मोदी सबका बाप !

    दिनांक :24-May-2023
Total Views |
नवी दिल्ली,
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या वादातून अब्दुल्ला यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत ते म्हणाले की, आम्ही यासाठी तयार आहोत. फारुख यांना G20 बद्दल विचारले असता ते म्हणाले की, काहीही झाले तरी त्याचा एक फायदा आहे की रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवले गेले आहेत.

Farooq Abdullah
 
स्थानिक वृत्तानुसार, माजी सीएम Farooq Abdullah म्हणाले की, मला काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींशी बोलायचे आहे. पंतप्रधान हा कोणत्याही पक्षाचा नसून संपूर्ण देशाचा असतो. ते म्हणाले की, जेव्हा कोणी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रिपदावर बसतो तेव्हा तो सर्वांचा बाप असतो. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री प्रत्येकाला आपली मुले मानतात आणि त्यांच्या अडचणीत त्यांच्यासोबत राहतात. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या प्रश्नावर उत्तर देताना फारुख म्हणाले की, आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. संसदेच्या उदघाटना संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, मी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही, कारण मी विरोधकांसोबत आहे. विरोधक काहीही करतील, मी तेच करेन. प्रबळ विरोधी पक्ष असल्याशिवाय कारभार चांगला होणार नाही, असे पंतप्रधान स्वतः सांगतात, त्यामुळे मी विरोधकांसोबत आहे. ते म्हणाले की, राष्ट्रपतींनी या नव्या संसदेचे उद्घाटन करावे कारण ते देशाचे सर्वात मोठे प्रतिनिधी आहेत.
 
Farooq Abdullah यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल विचारले असता ते म्हणाले की 2024 मधील परिस्थिती ठरवेल की पंतप्रधान कोण होणार. याबाबत आताच काही बोलणे चुकीचे ठरेल. ते म्हणाले की, वाजपेयी जसे २३ पक्षांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले, त्या वेळी मीही त्या आघाडीचा एक भाग होतो. राहुल गांधी हे मोठे नेते आहेत, पण पंतप्रधान कोण होणार हे निवडणुकीच्या वेळीच ठरवले जाईल. कर्नाटक निवडणुकीबाबत Farooq Abdullah म्हणाले की, या निकालावरून दिसून येते की लोकांनी जातीभेदाला नाही तर प्रेमाला प्रतिसाद दिला आहे. मात्र, काँग्रेसने बजरंग बलीचा मुद्दा उपस्थित करायला नको होता. भाजपनेही ते मोठ्या वाढवून चढवून मांडले. मोदी म्हणाले, मतदानाला जाताना बजरंगबलीचा नारा द्या, त्याचे हे म्हणणे चुकीचे आहे. निवडणुकीसाठी धर्माचा वापर करणे चुकीचे आहे. अल्लाह आणि रामाच्या नावावर मते घेऊ नये. धर्माचे धोरण भारताला हळूहळू कमकुवत करत आहे.