अमूल दुधावरून तामिळनाडूत वादंग!

मुख्यमंत्री स्टॅलिनने पंतप्रधांना लिहिले पत्र

    दिनांक :25-May-2023
Total Views |
नवी दिल्ली,  
Amul milk तामिळनाडूमध्ये अमूल दुधाच्या प्रवेशावरून वाद सुरु झाला आहे. अलीकडेच अमूलने कर्नाटकमध्ये प्रवेशाची घोषणा केली, त्यानंतर विरोधी काँग्रेस आणि जेडीएसने सरकार नंदिनी या स्थानिक ब्रँडला संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. त्याचवेळी भाजपने पलटवार करत काँग्रेसला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे असल्याचे सांगितले. दरम्यान, बंगळुरूमधील हॉटेल असोसिएशन असलेल्या ब्रुहत बेंगलुरु हॉटेल्स असोसिएशनने शहरातील अमूल उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. तसेच कर्नाटकातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केवळ स्थानिक ब्रँड नंदिनी वापरण्यास सांगितले. 
 

rtygr 
 
 
 
5 एप्रिल रोजी, Amul milk गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन (GCMMF), जे अमूल ब्रँड अंतर्गत डेअरी उत्पादने विकतात, त्यांनी ट्विट केले होते की ते कर्नाटकात प्रवेश करण्यास तयार आहे. अमूलच्या या ट्विटनंतर कर्नाटकातही राजकारण सुरू झाले आहे. राज्यातील आगामी निवडणुका लक्षात घेऊन नव्या ब्रँडची एंट्री हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात राजकीय पक्ष कोणतीही कसर सोडत नाहीत. प्रकरण इतके वाढले की राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावे लागले.सीएम स्टॅलिन यांनी पत्र लिहून तामिळनाडूतील आविन येथील दूध शेडमधून अमूलला दूध खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.