शेगाव,
Shegaon taluka : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शेगाव तालुक्याचे महाशिबिर दिनांक 26 मे 2023 रोजी येथील कुणबी समाज भवन येथे घेण्यात आले. या महाशिबिराचे उद्घाटन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी केले.
![Shegaon taluka Shegaon taluka](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/5/26/Shegaon-taluka_202305261835289029_H@@IGHT_360_W@@IDTH_600.jpg)
शासन आपल्या दारी या (Shegaon taluka) महाशिबिरामध्ये महसूल विभागामार्फत सातबारा, फेरफार, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र,संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, सलोखा योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, रेशन कार्ड शेतकरी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाअंतर्गत डीबीटी साठी फॉर्म भरून घेणे,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेशाचे वितरण तसेच नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या कुटुंबांना धनादेशाचे वितरण अशा एकूण 4112 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पंचायत समिती मार्फत प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, रोजगार हमी योजना अंतर्गत गुरांचे गोठे, माझी कन्या भाग्यश्री योजना अश्या एकूण 1452 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्याकडून ट्रॅक्टरचे वाटप, कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत लाभ वितरण व विविध प्रक्रिया उद्योगांना लाभ देणे असे एकूण 241 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
नगरपरिषद (Shegaon taluka) मार्फत प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री कर्ज योजना अंतर्गत एकूण 115 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.भारतीय स्टेट बँके मार्फत एकूण 151 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत 1852 लाभार्थ्यांना स्वामित्व योजनेअंतर्गत सनदेचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र बँकेमार्फत बचत गटाच्या 110 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. असे एकूण 8033 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. सदरच्या शिबिरासाठी विविध विभागांचे एकूण 14 स्टॉल लावण्यात आले होते व त्यासाठी प्रत्येक विभागाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली होती व त्यांच्या माध्यमातून सदरचा लाभ देण्यात आला.
शिबिरासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की शासन आपल्या दारी हा उपक्रम जनतेला तातडीने सेवा पुरविता याव्यात व त्यांना विविध कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नये यासाठी आवश्यक आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी फक्त चौकटीतच दिलेल्या वेळेत काम न करता जनतेसाठी आपला अधिकचा वेळ द्यावा व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोचवाव्यात.
या (Shegaon taluka) कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अतुल पाटोळे उपविभागीय अधिकारी खामगाव हे उपस्थित होते. शिबिराचे स्वरूप कसे असेल या बाबत प्रास्ताविक तहसिलदार समाधान सोनवणे यांनी केले. तसेच शिबिराच्या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सागर भागवत, गटविकास अधिकारी सतीश देशमुख, तालुका कृषी अधिकारी जे आर पवार, स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक राहुल घारगे, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक लाखे, नायब तहसिलदार पी जे पवार, तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व इतर सर्व विभागांचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.