- वनअधिकार्याची पिस्टलही घेतली ताब्यात
श्रीक्षेत्र माहूर,
Mahur city माहूर शहरातील अवधूत कल्याणकर यांच्या घरी सप्टेंबर 2022 मध्ये घरफोडी झाली होती. त्यात 80 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या चोरीत वनअधिकार्यांची पिस्टलही चोराने लांबवली होती. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या तपासकामी सायबर सेलच्या मदतीने माहूर पोलिसांनी 22 मे रोजी संध्याकाळी सुमारास सापळा रचून स्थानिक आठवडी बाजारातून घरफोडी करणार्या अट्टल गुन्हेगारास अटक केली. तर त्याने लपवून ठेवलेली पिस्टलही ताब्यात घेतली.
Mahur city माहूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार शेख जावेद अ. सत्तार (वय 34 वर्षे) हा मदिनानगर झोपडपट्टी मानोरा जिल्हा वाशिम येथील रहिवासी असून त्याच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी पुरावे नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी सांगितले. पोलिस तपासात माहूर वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्याकडे केलेल्या घरफोडीत शासकीय पिस्टल व रोख 3 हजार रुपयाची चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली.
त्यानंतर श्रीधर जगताप, विजय आडे, बाबू जाधव, सुशील राठोड, चंद्रप्रकाश नागरगोजे व चालक गुरनुले यांच्या पथकाने 23 मे रोजी सरकारी पंच नगर पंचायतीचे कर्मचारी गंगाधर दळवी व सुनील वाघ यांचे समक्ष मातृतीर्थ तलाव रोडवरील क‘ीडा संकुलाजवळील जंगलात अट्टल गुन्हेगाराने पुरून ठेवलेली पिस्टल ताब्यात घेतली. पिस्टल चोरी प्रकरणी आरोपीस बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
Mahur city माहूर पोलिसांनी ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेडचे अपर पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, भोकरचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, पोलिस निरीक्षक नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर, दीपक ओढने यांच्या विशेष सहकार्याने पार पाडली. माहूर पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून माहूर शहरात गत वर्षभरात घडलेल्या चोरी घरफोडयाचे रहस्य उलगडण्याची शक्यता तपास अधिकारी जगताप यांनी वर्तविली.