पाकिस्तानात हिंदू मुलींची 12 वर्षांत 14000 धर्मांतर प्रकरणे

26 May 2023 20:28:28
इस्लामाबाद, 
Pakistan Hindu women पाकिस्तानात हिंदू महिला आणि मुलींवर होणार्‍या अत्याचाराच्या कहाण्या भयावह आहेत. 12 वर्षांत मुलींची अपहरण, सामूहिक बलात्कार आणि धर्मांतराची 14 हजार प्रकरणे समोर आली आहेत. असाच एक अहवाल आणि व्हिडीओ पाकिस्तानच्या लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकलचे डॉ. विरजी लुंड यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पाठवला आहे.
 
 
Hindu women in Pakistan
 
या अहवालानुसार, चंदू या Pakistan Hindu women हिंदू मुलीचे पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. तिने न्यायालयात बाजू मांडली असता न्यायालयाने तिला त्याच गुंडांच्या ताब्यात दिले. याशिवाय सुमारे 12 जणांनी एका महिलेवर बलात्कार केला आणि नंतर तिचा धर्म बदलला. भिलजी राणा दुसरीकडे रहिमयार खान येथे मजूर म्हणून काम करायचे. एके दिवशी त्यांची पत्नी समदी शेतात मजूर म्हणून काम करीत होती. अचानक काही जण आले आणि जबरदस्तीने तिला घेऊन गेले. ते त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलीलाही घेऊन गेले. काही दिवसांनी त्यांच्या पत्नीवर 12 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. विनंती केली असता मुलीचा जीव वाचला. पत्नीचा धर्म बदलून तिचे नाव गुलाम फातिमा करण्यात आले. राणा सांगतात की, तो आपल्या मुलीसोबत भारतात आला होता. आता फक्त बायकोचा पासपोर्ट साईज फोटो उरला आहे. ती जिवंत आहे की नाही माहीत नाही.
 
 
Pakistan Hindu women सीमांत लोक संघटनेच्या अभ्यासानुसार 1971 पासून सुमारे सात लाख पाक विस्थापित लोक राजस्थानमध्ये आले आहेत, चक‘ चालूच आहे. विस्थापितांच्या हिताचे रक्षण करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंग सोढा यांनी केंद्र सरकारकडे केली. त्यांनाही उदरनिर्वाहासाठी काश्मिरी निर्वासितांप्रमाणे पुनर्वसन पॅकेज मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0