दक्षिण नागपुरात वीजसंकट

load shading महावितरण विरोधात रोष वाढला

    दिनांक :26-May-2023
Total Views |
नागपूर,
 
load shading गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात विजेचे संकट निर्माण झाले आहे. सातत्याने विजेच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने दक्षिण नागपुरातील नागरिकांची सहनशीलताही आता संपत चालली आहे. load shading महापारेषणच्या बेसा 132/11 केव्ही उपकेंद्रातील 25 एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. load shading त्यामुळे रविवारपासूनच दक्षिण नागपुरातील नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे.
 

load shading 
 
load shading रात्री 10 वाजता गेलेली वीज पहाटे 4 वाचता येते तर काही भागात रात्री 1 वाजता गेलेली वीज मध्यरात्री 3 वाजता येत आहे. नागरिकांना एकप्रकारे हे भारनियमन असल्याचे जाणवत असल्याने महावितरण विरोधात रोष वाढत चालला आहे. load shading नागपूरचे तापमान 43 अंशाच्या वर आहे. गुरुवारपासून नवतपा सुरू झाले आहे. आधीच उकाड्याने हैराण असलेले नागरिक घरी वीज नसल्याने कासावीस होत आहेत. load shading ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागत आहे.
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र