पुसद जिल्ह्याच्या वावड्या..!

- नाईक घराण्याचे जिल्हा निर्मितीसाठी मन:स्वी योगदान किती ?

    दिनांक :29-May-2023
Total Views |
रवी देशपांडे, पुसद 
तालुका वार्तापत्र, 
Pusad district : आम्ही पुसदकर आजतागायत अभिमानाने सांगतो पुसद विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते वसंतराव नाईक आणि त्यानंतर त्यांचे पुतणे वारसदार सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने महाराष्ट्राला दोन मु‘यमंत्री लाभले. या दोघांमुळेच खर्‍या अर्थाने पुसदचे नाव राजकीय नकाशावर आले. वसंतराव नाईक तब्बल साडेअकरा वर्षे तर सुधाकरराव नाईक पावणे दोन वर्षे राज्याचे मु‘यमंत्री राहिले.
 
Pusad district
 
खरं तर वसंतराव नाईकांचे अपुर्ण राहिलेले पुसद जिल्हा (Pusad district) निर्मितीचे स्वप्न त्यांच्या पश्चात सुधाकरराव नाईक यांनी पूर्ण करावयास पाहिजे होते. पण त्यांच्या अल्पावधीच्या कारकिर्दीत त्यांना ते पूर्ण करता आलेच नाही, याची कारणेही त्यांच्या कारकिर्दीत चर्चेत होती. एक तर राज्याच्या तिजोरीत पुसद जिल्हा निर्मितीसाठी पैसा नव्हता हे जर कारण खरे होते तर वाशीम जिल्हा निर्मिती ही तसे पाहिले तर व्हायला नको होती. पण भाजपा-शिवसेना यांच्या काळात 1 जुलै 1998 ला वाशीम जिल्हा झालाच.
 
 
पुसद जिल्हा (Pusad district) व्हावा, अशी इच्छाशक्ती सुधाकरराव नाईकांना त्यांच्या मु‘यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दाखविता आली नाही, की वरिष्ठांची मर्जी त्यांना प्राप्त नव्हती. दुसरेही कारण त्यावेळी चर्चिले गेले ते हे की, पुसद जिल्हा केला तर अ‘‘या विस्तीर्ण किनवट ते पुनवट यवतमाळ जिल्ह्यावरील विशेषतः नाईक घराण्याचे वर्चस्व सीमीत होईल. नेमके हेच पुसद जिल्हा निर्मितीला बाधक ठरले अशीच काहीशी धारणा पुसदकरांची झाली हे सत्य नाकारता येणार नाही.
 
 
सुधाकरराव नाईक यांच्या निधनानंतर 1952 सालापासून एक घराणा नेतृत्व मनोहर नाईकांकडे आले. मनोहर नाईक पुढे राज्याचे मंत्री झाले. पण ते अ‘खी 5 वर्षे अन्न व औषधे प्रशासन खाते सांभाळता सांभाळता पुसद जिल्हा निर्मिती विनाच गेली. त्यानंतर राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. स्वतः कॅबिनेट मंत्री असताना मनोहर नाईकांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी किती प्रयत्न केले ते त्यांनाच विचारा. खरं तर त्याचवेळी (Pusad district) जिल्हा निर्मितीसाठी त्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं.
 
 
मात्र नाईक घराण्याच्या अनास्थेपायी पुसदकर मतदारांना हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. महाविकास आघडीच्या अडीच वर्षाच्या सत्ता काळात खरे तर पुसद जिल्हा आणि माळपठारावरील सिंचनाचा प्रश्न खुद्द नेतृत्वाचे धनी मनोहर नाईक यांनी अग‘क‘माने हट्टपूर्वक सोडवावयास हवा होता. आता तर नेतृत्वाची हवाच गेली ती भविष्यातील राज्याच्या अस्थिर राजकारणापायी पुनश्च भरल्या जाईल हे तर नाईक नेतृत्वासाठी अरण्य रुदन ठरावे. तद्वतच पुसद जिल्हा होणार या सतत उठणार्‍या वावड्या ऐकून पुसदकर जनता हात चोळीत बसणार एवढे मात्र खरे !