मोकाट कुत्र्यांच्या हैदोसातून शहर कधी मुक्त होणार?

03 May 2023 14:32:49
नागपूर,
 
stray dogs आज सकाळी पडोळे चौकात मोकाट कुत्र्याने एका दुचाकीस्वाराचा चावा घेतला. याबाबत माहिती घेतली असता असे कळले की, त्या जागेवर हे कुत्र्यांचे टोळके नेहमी बसले असते आणि रात्री किंवा सकाळी दुचाकी वाहने किंवा चारचाकी वाहनांच्या मागे धावून चावा घेतात. stray dogs वाहन चालकांना अपघात होण्याची देखील भीती असते. सदर इसमाला मेडिकल कॉलेजमध्ये औषधोचारासाठी नेले असता तिथे आणखी बरेच लोक शहरातील विविध भागातून कुत्रा चावल्यानतर उपचारासाठी आले होते. अशी संख्या जवळपास रोजच असते असे देखील कळले. stray dogs
 
 
 
stray dogs
 
 
stray dogs यावर महानगर पालिका आणि प्रशासन मात्र मूग गिळून बसले आहे. कोणी थोडा आवाज उठवला की हे लगेच थातूरमातूर 2-3 दिवस कारवाई केल्याचे दाखवतात, मात्र नंतर परिस्थिती जैसे थे राहते. या समस्येवर त्वरित तोडगा निघावा, ही नागरिकांची अपेक्षा आहे, पण तसे होताना दिसत नाही. पशु प्रेमी संघटनांनी देखील ह्या समस्या समजून घेऊन प्रशासनास मदत करणे गरजेचे आहे. मुक्या प्राण्यांबद्दल भूतदया असणे गरजेचे आहे पण मनुष्य जीवास धोका होणार नाही, याची पण तितकीच काळजी घेतली पाहिजे. stray dogs शहरातील मैदाने, चौरस्ते, फेरीवाले यांची दुकाने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्यांचे वास्तव्याचे ठिकाण बनले आहेत आणि तिथे त्यांना नियमित खायला मिळते म्हणून, ते तिथे ठाण मांडून बसलेले असतात.
 
 
stray dogs या नागरी समस्येवर तातडीने उपाययोजना प्रशासनकडून अपेक्षित आहे. ह्यावर भर म्हणून मेडिकल किंवा सरकारी इस्पितळात कुत्र्याच्या चावण्यावर देणारी लस सर्वांना मोफत दिली जात नाही तर ती बाहेरून विकत आणावी लागते. म्हणजे पीडित व्यक्तीला त्रास तर आहेच वरून आर्थिक भुर्दंड वेगळा. प्रशासन ह्यावर लवकर तोडगा काढेल ही माफक अपेक्षा! stray dogs
 
सौजन्य: विकास देशपांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0