नागपूर,
entering Nagpur temples :नागपुरातील जुन्या आणि प्रसिद्ध असलेल्या टेकडी गणपतीच्या मंदिरात आता नवा नियम लागू झाला आहे. टेकडीच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.दरम्यान आता मंदिर संस्थानांकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंदिर परिसरात फलकबाजी देखील करण्यात आली आहे. अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजेच वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना मंदिर प्रवेश मिळणार नाही.
यामध्ये शॉर्ट पॅन्ट,स्कर्ट, शॉर्ट ड्रेस अस देखील त्या फलकावर लिहण्यात आलं आहे. (entering Nagpur temples) तसचं भारतीय संस्कृती आणि सभ्येतेच भान राखा असे आवाहनही मंदिर संस्थानांकडून करण्यात आले आहे. यामुळे आता भाविकांनी गणरायाच्या दर्शनाला जाण्याआधी ही काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान आज फलक लागूनही मंदिर परिसरात काहींनी अश्या कपड्यांमध्ये प्रवेश केला, याबाबत मंदिर प्रशासनाशी बोलले असता सध्या याबाबत सुरुवात असून मंदिर परिसरात आणखी फलक लावण्यात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.