'गो' फॉर गोरेवाडा ...!

gorewada zoo nagpur पर्यटकांसाठी पुरातत्व थीम पार्क

    दिनांक :30-May-2023
Total Views |
नागपूर,
 
gorewada zoo nagpur महाराष्ट्रातील वनसंपदा प्रामुख्याने विदर्भात आढळते. वन विभागाने २०२२ मध्ये राज्यातील प्रादेशिक वन, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पात केलेल्या चौथ्या टप्प्यातील गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास ४४६ वाघांची उपस्थिती जाणवली आहे. मुख्य म्हणजे गेल्या वर्षभरात २५ वाघांचा मृत्यू होऊनही एकंदरीत वाघांची संख्या वाढली आहे. gorewada zoo nagpur नागपूरच्या सभोवताली असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड कर्हांडला वन्यजीवन अभयारण्य, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नावारुपास आणले आहे. gorewada zoo nagpur
 

gorewada  
 
 
gorewada zoo nagpur अर्थातच व्याघ्र दर्शनाचे आकर्षण आपण सर्वांना असते. इतरांना हमखास दिसणारे वाघोबा नेमके आपल्या सफारीच्या वेळेला का दडून बसतात ? याची मनाला हुरहुर लागून असते. मात्र आता अशी निराशा आपल्या पदरी येणार नाही. कारण नागपूरला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान इथे असलेली राजकुमार वाघ आणि लिली वाघीणीची जोडी आपल्याला हमखास दर्शन देते. gorewada zoo nagpur नागपूर शहराला लागूनच गोरेवाडा जंगल आणि तलाव आहे. २००६ ला महाराष्ट्र शासनाने गोरेवाडा तलाव आणि जंगल लगतची जवळपास १९१४ हेक्टर जागा गोरेवाडा प्राणिसंग्रहालयासाठी उपयोगात आणण्याचे ठरवले होते. या प्रकल्पाला सुटसुटीत करण्यासाठी आणखी २६ हेक्टर जागा महाराष्ट्र शासनाने व्यावसायिक कारणांसाठी हस्तांतरित केली होती. ‌gorewada zoo nagpur
 
अखेर या प्रकल्पाला २०२१ साली मुर्तरुप आले आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२१ ला उद्घाटन झाले. या पार्कला सेंट्रल झू ऑथॉरीटीची मान्यता असून कॅप्टीव्ह (बंदिस्त) झू सफारी प्रकारात भारतातील सर्वात मोठा झूलॉजीकल पार्क‌‌‌ मानण्यात येत आहे. या पार्कमध्ये वन्यजीवांसाठी रेस्क्यू सेंटर, भारतीय वन्यजीव सफारी, आफ्रिकन सफारी, इंटरप्रिटेशन सेंटर आणि नाईट सफारीचे प्रयोजन आहे. भारतीय सफारीसाठी १४५ हेक्टर भूभाग निश्चित करण्यात आला असून यांत लेपर्ड सफारी (बिबट्या), बीअर सफारी (अस्वल), व्याघ्र सफारीचा समावेश होतो. gorewada zoo nagpur
 
याव्यतिरिक्त पर्यटकांच्या आकर्षणासाठी पुरातत्व थीम पार्क, प्रागैतिहासिक पार्क (डायनॅसोर थीम), एक्झोटीक एव्हीअरी ॲंड रेनफॉरेस्ट थीम, रेस्क्यू सेंटर, ट्रायबल व्हिलेज ट्रेल, गोरेवाडा रिझर्व्ह फॉरेस्ट, नेचर ट्रेल, व्यावसायिक संकुल इत्यादी प्रकल्पांची भर पडणार आहे. सध्याचे गोरेवाडा रेस्क्यू सेंटर २०१५ पासून कार्यान्वित असून वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण, काळवीट आणि विविध पक्षांवर उपचार आणि संगोपन केले जाते. gorewada zoo nagpur या पार्कची संकल्पना अजून पूर्णत्वास यायची आहे. प्रस्तावित पार्कमध्ये हर्बीवोर सफारी (तृणभक्षी, शाकजीवी) ४० हेक्टर, नाईट सफारी ४५ हेक्टर, आफ्रिकन सफारी ९० हेक्टर, बायो पार्क ३० हेक्टर, बर्ड पार्क ०७ हेक्टर, रिझरव्हायर २० हेक्टर, एन्ट्रन्स प्लाझा १६.५ हेक्टर असणार आहेत.
 
gorewada zoo nagpur पहिल्या टप्प्यात सध्या भारतीय सफारी सुरू करण्यात आली असून यांत बिबट्या,अस्वल, व्याघ्र आणि हर्बीवोर सफारीचा समावेश होतो. सफारी करिता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बुकींग सुविधा उपलब्ध आहेत. मात्र शनिवार, रविवार किंवा इतर सुट्ट्यांच्या दिवशी अगोदर बुकींग केलेले केंव्हाही योग्य ठरते. कारण प्रवेशद्वारातून ऑनलाईन बुकींग असले किंवा ऑफलाईन बुकींग शिल्लक असेल तरच प्रवेश मिळतो. सफारी करिता एसी, नॉन एसी बसेसची सोय आहे. एन्ट्रन्स प्लाझा जवळच दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग आहे. gorewada zoo nagpur तिकिटघराला लागूनच सौवेनीर दालन आहे. तिथे बांबू पासून निर्मित वस्तू, लाकडी गृहोपयोगी वस्तू, कापडी आणि इतर दागिने, सुंदर पेंटिंग्ज आणि युवा युवतींसाठी गोरेवाडाचा लोगो असलेले टी शर्ट, हॅट ,पर्स प्रदर्शन, विक्री साठी उपलब्ध आहेत. एन्ट्रन्स प्लाझा चा संपूर्ण परिसर सुंदर लॅंडस्केपने सजवण्यात आला असून बच्चे कंपनीसाठी विरंगुळा म्हणून विविध प्राण्यांचे पुतळे आणि खेळण्यांची सोय केलेली आहे. पर्यटकांच्या पोटपूजेसाठी एन्ट्रन्स प्लाझा लगतच एक रेस्टॉरंट आहे. त्यात नाश्ता आणि जेवणाची सोय आहे.
 
 
gorewada zoo nagpur बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान इथल्या भारतीय सफारीची सुरूवात होते लेपर्ड (बिबट्या) सफारीने. या सफारी करिता २५ हेक्टरमध्ये आधीच विरळ होत चाललेल्या जंगली भागात मानवी हस्तक्षेपाची थीम साकारली आहे. यांत काही जागी तुटकी घरे, कमी उंचीच्या भिंती तर कुठे मचाणासारखी रचना केलेली आहे, जेणेकरून बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळेल अथवा आडोसा शोधता येईल. gorewada zoo nagpur या सफारीत सात बिबटे असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात तीन बिबटे दृष्टीस पडतात. त्यातही दुपारची उन्हाची वेळ असल्याने बिबट्यांनी फिडींग शेडच्या बाजूने मस्त ताणून दिल्याने त्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला नाही. सध्यातरी एप्रिलमध्ये गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील चिंकी या मादा बिबटने दोन बछड्यांना तर रुची मादा बिबटने तीन बछड्यांना जन्म दिल्याचे कळते. वास्तविकत: वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत बिबट्या कुठल्याही वातावरणात स्वतःला सहज सामावून घेत असल्याने त्यांची संख्या आणि जीवंत राहण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच अगदी गावाशेजारी, मनुष्य वस्तीजवळ देखील त्यांचा संचार आढळतो. 
 
सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरु आहेत आणि नागपूरच्या जवळच गोरेवाडा प्राणीसंग्रहालय आहे. मग विचार कसला करताय?  'गो' फॉर गोरेवाडा ...! gorewada zoo nagpur
 
डॉ. अनिल पावशेकर 
९८२२९३९२८७