शेगाव,
येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे आध्यात्मिक केंद्र Anand Sagar आनंद सागरचा काही भाग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थानच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोविड काळानंतर आध्यात्मिक केंद्राचा काही भाग आहे त्या स्थितीमध्ये सुरू करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. बंदच्या काळात निधीअभावी संस्थानचे सर्व सेवाभावी उपक‘म व नियोजित अत्यावश्यक विकास कामे थांबविण्यात आली होती.
संस्थानच्या विश्वस्त Anand Sagar मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व सेवाकार्यांचा प्राधान्यक‘म ठरविण्यात आला. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर आर्थिक घडी नीट बसल्यावर तसेच आवश्यक सेवाधार्यांची सेवा व पर्याप्त मुबलक पाणी उपलब्ध झाल्यावर आध्यात्मिक केंद्राची देखभाल दुरुस्ती व पुढील विकासकार्य हाती घेण्यात येतील, असे या प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. आध्यात्मिक केंद्र आनंद सागरमध्ये प्रवेश नि:शुल्क राहील. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत केंद्र सुरू राहील. सायंकाळी 4 वाजतापासून प्रवेश बंद करण्यात येईल, असेही पत्रकात म्हटले आहे.