‘द केरळ स्टोरी'

the kerala stories सामोरे जाण्यास समाज का घाबरतो

    दिनांक :04-May-2023
Total Views |
वेध
- संजय रामगिरवार 
the kerala stories ‘द काश्मीर फाईल्स' नंतर ‘द केरळ स्टोरी' हा आणखी एक चित्रपट सध्या वादाचा मुद्दा ठरत आहे. याचे कारणही तसेच आहे. या चित्रपटातून एक भयानक वास्तव समाजापुढे येत आहे. या चित्रपटाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. the kerala stories आता केरळ उच्च न्यायालयात ५ मे रोजी सुनावणी होणार आहे आणि त्याच दिवशी हा चित्रपट देशभरात प्रदर्शितही होत आहे. ‘द केरळ स्टोरी' the kerala stories या चित्रपटाचे निर्माते विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन तसेच अभिनेत्री अदा शर्मा पोटतिडकीने सांगत आहे की, हा विशिष्ट धर्माचा विषय नसून असंख्य मुलींना सापळा रचून दहशतवादाच्या दरीत लोटल्या जाण्याच्या भयाण वास्तवावर, सत्यघटनेवर आधारित कथानक आहे. the kerala stories तीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची ही कहाणी आहे. पैकी एक मुलगी अफगाणिस्तानच्या कारागृहात आहे. एकीने आत्महत्या केली आहे तर एका मुलीवर वारंवार समूह अत्याचार झाला आणि आता ती कुठे आहे, याची कुणालाच कल्पना नाही.
 
 
 
 
kerala
 
 
 
the kerala stories अभिनेत्री अदा शर्मा यांनी छळ झालेल्या या पीडित युवतींची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्यासोबत काय घडले, हे पूर्णपणे जाणून घेतले. विशिष्ट समाजातल्या कट्टरपंथी तरुणांना हिंदू व ख्रिश्चन युवतींना अडकवण्यासाठी कसे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्या मुलींचे धर्मांतर करून तिला दहशतवादी संघटन इसिसची ‘सेक्स स्लेव्ह' बनण्यासाठी कसे पाठविले जाते, हे या चित्रपटात दाखवले गेले आहे. हृदयाला पीळ पाडणारा हा विचार आहे, नव्हे वास्तव आहे. मोठ्या लाडाने वाढवलेल्या आपल्या मुलीला अशाप्रकारे कुणीतरी फसवून तिचे अख्खे आयुष्य बरबाद करणे हा मानवतेला लागलेला कलंक आहे. सर्व समाजाने या प्रकाराचा तीव्र निषेध करून अशा विचारांना, कृतीला ठेचून काढले पाहिजे. पण काही लोक या चित्रपटाला ‘प्रोपगंडा' म्हणत सुटले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळेचा आणि कर्नाटकातील निवडणुकीचा संदर्भ जोडत राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. काही काँग्रेसी नेते आणि त्याच पक्षात असलेले वकील अशा तृष्टीकरणाच्या विचारांना खतपाणी घालत आहेत. या चित्रपटातील एका ‘टिझर'चा आधार घेत अत्याचारित मुलींच्या आकड्यांविषयी वाद उकरून काढला जात आहे.
 
 
मुस्लिम नेते बक्षीस जाहीर करीत आहेत. पण तेही असा प्रकार केरळमध्ये होतच नाही हे ठामपणे नाकारत नाही, हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. किती मुली या भयंकर जाळ्यात अडकल्या हा वादाचा विषय असू शकत नाही, चार-दोन जरी या जीवघेण्या अत्याचाराच्या बळी ठरल्या असतील, तरी मानवता कलंकित होत आहे, हे समजून घेतले पाहिजे. ‘द केरळ स्टोरी'मधील ‘शालिनी उन्नीकृष्णन्(पुढे फातिमा) अशी या चित्रपटाची मुख्य भूमिका साकारणा-या अदा शर्मा यांचे डोळे केवळ याबाबतच्या चर्चेने पाणावतात. हे चित्र आम्ही त्यांच्या काही मुलाखतींमधून सध्या अनुभवतो आहोत. तेव्हा प्रत्यक्ष चित्रपटाचे कथानक किती यातना देणारे असेल, याची कल्पना करता येईल. चित्रपट समाजाचा आरसा असतो. ती अभिव्यक्ती आहे. कधी कधी ती ‘अनकम्फर्टेबल ट्रूथ' पण सांगते. ते स्वीकारण्याची सहनशीलता समाजात असली पाहिजे. वास्तव स्वीकारून समाजातून अशी कीड संपवण्याची ताकद समाजात येणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने हा चित्रपट एक प्रयत्न आहे.
 
  
मात्र, समाजातील काही जण या चित्रपटाच्या प्रदर्शनालाच स्थगिती द्यावी म्हणून याचिका दाखल करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार देऊन विरोधकांना चपराक लगावली आहे. सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटाला परवानगी दिली आहे. अशा वेळी होत असलेला विरोध अनाकलनीय आहे. चित्रपटाचे काम सुरू होऊन सात वर्षे झाली आहेत. अनेक तथ्य-पुरावे गोळा करूनच सेन्सॉर बोर्डापुढे चित्रपट गेला आणि आता प्रदर्शित होत असताना वेळेचे गणित जुळवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे. चित्रपटातून समाजासमोर येणारे भयानक कटकारस्थान केवळ केरळमध्येच नाही, तर अनेक राज्यांतून सुरू आहे. ‘लव्ह जिहाद' गंभीर समस्येचे रूप धारण करून समाजात रुजत असताना अशा विषयांवर चर्चा नको का व्हायला? चित्रपट नको का निघायला, या प्रश्नांना सामोरे जाण्यापासून समाज का घाबरतो आहे, हा चिंतेचा विषय आहे. एकदा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या; तो बघा आणि मग ठरवा, या चित्रपट निर्माता, दिग्दर्शकांंच्या भूमिकेचा अवघ्या समाजाने आदर केला पाहिजे, असे वाटते.
९८८१७१७८३२