- 20 महिन्यांनंतर शोध पूर्ण
पंढरपूर,
अखेर Vitthal Rukmini Temple विठ्ठल मंदिराच्या कार्यकारी अधिकारीपदाचा शोध संपला असून, राजेंद्र शेळके या नांदेडच्या धर्माबादेतील उपजिल्हाधिकार्याने देवाची सेवा करण्यास संमती दाखवल्यावर शासनाने त्यांची विठ्ठल मंदिराचा कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षभरातील देशभरातून लाखो भाविक येथे येत असतात. दुर्दैवाने मंदिर समितीचा कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर येण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून एकही अधिकारी पुढे यायला तयार नसल्याचे धक्कादायक चित्र होते.
Vitthal Rukmini Temple विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही विधी व न्याय विभागाकडे असून, यासाठी प्रत्येक वेळी महसूल विभागाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याला प्रतिनियुक्तीवर पाठवावे लागते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते. त्यामुळे वारंवार पंढरपूरच्या प्रांताधिकार्याकडे याचा पदभार दिला जात होता. यापूर्वी 9 सप्टेंबर 2021 रोजी तत्कालीन कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांच्या प्रतिनियुक्तीचा दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर मंदिर समितीला नियमित कार्यकारी अधिकारी मिळालेला नव्हता. आता तब्बल 20 महिन्यांनंतर विठुरायाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी राजेंद्र शेळके लवकरच रुजू होणार आहेत.