बालकांची 2-डी इको तपासणी

जागृत पालक सुदृढ बालक अभियान

    दिनांक :09-May-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 9 मे
examination of children राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने 9 फेब्रुवारीपासून जागृत पालक सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यात आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने संशयीत हृदय रुग्णांपैकी 73 बालकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अमरीश मोहबे यांनी दिली. या अभियानासाठी 272 आरोग्य पथक तयार करण्यात आले असुन त्यात राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत वैद्यकिय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, भरारी पथकाचे मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील बालकांची तपासणी करण्यात येत असल्याची माहीती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी दिली आहे.
 

sAET
 
 
जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडी, बालवाडी व खाजगी नर्सरीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच 6 ते 18 वर्ष वयोगटातील शासकीय, खाजगी शाळा, अनुदानित शाळा, दिव्यांग शाळा व आश्रमशाळेतील विद्यार्थांची तसेच शाळा बाह्य मुले व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आजारी आढळून आलेल्या बालंकावर औषधोपचार करण्यात आले येत असून आवश्यक असलेल्या बालकांना सोनोग्राफी, एक्स-रे, ई.सी.जी.साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित केले जात आहे. तपासणी शिबीर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अमरीश मोहबे, निवासी चिकित्सा अधिकारी डॉ. बी. डि. जयस्वाल सर यांच्या उपस्थिती पार पडले. शिबिरामध्ये आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धा येथून प्रतीक गडकरी, गोंदिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक संजय बिसेन व अनिरुद्ध शर्मा आणि संपूर्ण राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.