इंदूरची अस्मी जैन अ‍ॅपल स्विफ्ट स्टुडंट चॅलेंजची विजेती

01 Jun 2023 18:05:16
- डोळ्यांसाठी विशेष अ‍ॅपची निर्मिती

इंदूर, 
अ‍ॅपल या नामांकित कंपनीकडून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी स्विफ्ट स्टुडंट ही अ‍ॅप बनवण्याची स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धमध्ये जगभरातील 30 देशांमधील विद्यार्थी सहभागी होतात. यामध्ये यावर्षी भारतीय मुलीने बाजी मारली आहे. इंदूरची वीस वर्षीय Asmi Jain अस्मी जैन हिने डोळ्यांसाठी एक विशेष अ‍ॅप बनवत या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव नोंदवले आहे. अस्मी ही सध्या मेडी-कॅप्स या विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे.
 
 
Asmi-jain
 
या स्पर्धेमध्ये विद्यार्थी आरोग्य, खेळ, मनोरंजन आणि पर्यावरण या विषयांशी संबंधित स्विफ्ट कोडिंगचा वापर करून अ‍ॅप बनवतात. विजेत्यांची घोषणा करताना अ‍ॅपलच्या वर्ल्डवाईड डेव्हलपरचे व्हाईस प्रेसिडेंट सुसान प्रेस्कॉट यांनी सांगितले की, आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आश्चर्यचकित झालो आहोत. यावर्षी या स्पर्धेमध्ये नव्या मूल्यांचा आणि रोजच्या जीवनातील गोष्टींचा विचार करून त्यांना आधुनिकतेची जोड देत विद्यार्थ्यांनी अ‍ॅप्स बनवले आहेत.
 
 
इंदूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या अस्मीच्या मित्राच्या काकांची एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनतर त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्यांना पॅरालेसिसचा देखील त्रास झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या डोळ्यांची हालचाल करणे अशक्य होऊ लागले. या सर्व गोष्टींचा विचार करून Asmi Jain अस्मीने एक असे अ‍ॅप बनवले ज्यामुळे आपण डोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. तसेच ज्यांना डोळ्यांच्या गंभीर समस्या आहेत त्यांच्यासाठी हा अ‍ॅप फायदेशीर ठरू शकतो. या वर्षीच्या स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज विजेत्यांमध्ये मार्टा मिशेल कॅलिएंडो आणि येमी एगेसिन या विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. अ‍ॅपलचा वार्षिक कार्यक‘म वर्ल्डवाईड अ‍ॅप्स कॉन्फरन्स येत्या 5 जूनपासून सुरू होणार आहे.
Powered By Sangraha 9.0