जगदीश सभागृहात 10 जूनपर्यंत बाल संस्कार वर्ग

sanskar warg संस्कार वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन

    दिनांक :01-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
sanskar warg युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, राणाप्रतापनगर, पी. अ‍ॅण्ड टी. हाऊसिंग सोसायटी, नागपूर आणि अत्रे लेआऊट प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने संस्कार वर्ग आयोजित केला आहे. sanskar warg हा संस्कार वर्ग 1 ते 10 जून या कालावधीत रोज सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत जगदीश सभागृह प्रतापनगर येथे होईल.
 
 
sanskar
 
sanskar warg इयत्ता पहिली ते नववी (वय 6 ते 14) या वयोगटातील मुलामुलींना दररोज व्यायाम, खेळ, चित्रकला, क्राफ्ट, बुद्धिबळ, नाटक, कविता, गीत, कथा, श्लोक, योग, सुंदर हस्ताक्षर, गणितातील गमतीजमती, सामान्य ज्ञान हे विषय शिकविले जातील. sanskar warg पालकांनी आपल्या मुलांना पाठवून, या संस्कार वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक उज्वल जोशी यांनी केले आहे. वर्गासाठी किशोर मुळे, आनंद पाठक, सर्वेश तिवारी, राम केळापुरे, संदीप देव, सविता मुळे, पल्लवी जोशी, अर्चना मुंदडा आदी सहकार्य करीत आहेत. sanskar warg
 
सौजन्य : उज्वल जोशी, संपर्क मित्र