- अमोल पुसदकर
बालासोर येथे रेल्वे दुर्घटना झाली. नजीकच्या काळातील एक मोठी रेल्वे दुर्घटना आपण तिला म्हणू शकतो. परंतु दुर्घटना होताच (Rashtriya Swayamsevak Sangh) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तिथे सर्वप्रथम पोहोचले. सुरुवातीला जेथे अपघात झाला त्याच्याजवळ ज्या गावात शाखा होती त्या गावातील स्वयंसेवक पोहोचले. पाहता पाहता तेथील मंडळातील व त्या तालुक्यातील स्वयंसेवकही तेथे पोहोचले. जखमी लोकांना वेगळे काढणे, त्यांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात पोहोचविणे, त्यांच्यासाठी रक्तदान केंद्र सुरू करणे असे कार्य केले गेले. जे स्वयंसेवक डॉक्टर होते त्यांनी आपापल्या परीने विविध ठिकाणी जाऊन सेवा दिलेली आहे. अनेक स्वयंसेवकांनी रक्तदानासाठी आपला सहभाग नोंदविला आहे. जे लोक दुर्दैवाने मरण पावले होते त्यांना वेगळे काढणे, ओळख पटविणे, त्यांच्या जवळच्या चीजवस्तू, मोबाईल बोटातील अंगठ्या, गळ्यातील सोन्याचे दागिने इत्यादी गोष्टी व्यवस्थितपणे त्याची नोंद घेणे, पोलिसांना त्याबद्दल सांगणे, जे नातेवाईक आपल्या आप्तस्वकीयांना शोधत तिथे पोहोचले त्यांची विचारपूस करणे, त्यांना योग्य माहिती देणे हे कार्य स्वयंसेवकांनी केले. पोलिस, सैन्यातील जवान व मदत कार्यात सहभागी लोकांच्या चहा-नाश्ता-भोजनाची व्यवस्था करणे यामध्ये सहभाग देण्यात आला.
थोडक्यात काय तर ही घटना घडल्यावर आपल्या घरचे कोणीतरी त्यामध्ये सापडले आहे अशा पद्धतीच्या भावनेने (Rashtriya Swayamsevak Sangh) स्वयंसेवकांनी रात्रंदिवस कार्य केले. ज्या मृतदेहांना कोणी हात लावायला तयार नव्हते त्यांना व्यवस्थितपणे उचलून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याच्या कामांमध्ये स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की, ज्या मृतदेहाला हात लावायला कोणीही तयार नसते त्याला स्वयंसेवक हात कसे काय लावू शकतात? रक्तबंबाळ जखमींना हे स्वयंसेवक कसे काय उचलू शकतात? यांना कसे काय समजते की रक्तदान शिबिराचे आयोजन केले पाहिजे? मदत कार्यात गुंतलेल्या लोकांना मदत केली पाहिजे, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे हे त्यांना कसे काय समजते? हे शिक्षण त्यांना कुठे मिळते? तर याचे उत्तर आहे संघाच्या शाखेमध्ये. परंतु, संघाच्या शाखेमध्ये जे कार्यक‘म होतात ते कार्यक‘म तर शारीरिक व बौद्धिक कार्यक‘म आहेत. त्यामध्ये मृतदेह उचलणे, त्यांची विल्हेवाट लावणे अशा पद्धतीचे शिक्षण तर देण्यात येत नाही.
संघाच्या शाखेमध्ये (Rashtriya Swayamsevak Sangh) जाणारी जी व्यक्ती आहे तिच्या मनामध्ये सामाजिक भाव निर्माण होतो. जिथे काही कमी असेल तिथे आम्ही पोहोचले पाहिजे ही भावना निर्माण होते आणि ज्या वेळेस अशा पद्धतीचा एखादा अपघात होतो किंवा राष्ट्रावर एखाद्या परकीय राष्ट्राचे आक‘मण होते किंवा नैसर्गिक आपत्ती कोसळते, ज्यावेळेला समाजजीवन प्रभावित होते, संकटात सापडते अशा वेळेस संघाच्या स्वयंसेवकांमध्ये ही स्वाभाविक भावना निर्माण होते. ज्यांच्यावर आपदा म्हणजे संकट आलेले आहे ते आमचे कुणीतरी समाज बांधव आहेत व त्यांच्या मदतीला आम्ही कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता पहिले धावून गेले पाहिजे व त्यांना संकटमुक्त केलं पाहिजे, हा भाव संघाच्या स्वयंसेवकांमध्ये निर्माण होतो. काही वर्षांपूर्वी उत्तर काशीमध्ये भूकंप आला होता. त्यामुळे खूप मोठे भूस्खलनही झाले होते. अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले. अनेक जखमी झाले. अनेकांची घरे पडली. अशा परिस्थितीमध्ये संघाने त्यावेळेस ठरविले होते की, सर्व शाखांमधून निधी त्या आपदग‘स्तांसाठी जमा केला जाईल व तो त्यांच्यापर्यंत पाठविला जाईल. केरळमध्ये संघाची एक शाखा होती. त्या शाखेमध्ये लहान लहान मुले यायची. त्यामध्ये तिथल्या एका कम्युनिस्ट नेत्याचा मुलगासुद्धा यायचा. मुख्य शिक्षक त्या स्वयंसेवकाच्या घरी गेला त्यावेळेस त्या नेत्याने त्याला 100 रुपये दिले व सांगितले की, (Rashtriya Swayamsevak Sangh) आमच्या परिवारातर्फे हे योगदान घ्या. त्यावेळेस तो मुख्य शिक्षक आश्चर्यचकित झाला. त्याला माहीत होते की हे कम्युनिस्ट नेते आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांना विचारले की, आम्ही 10 रुपये मागितले असताना 100 रुपये कसे काय देत आहात? त्यावेळेस तो नेता त्यांना म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या आठ वर्षांच्या मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण केलेली आहे. केरळच्या माणसाला वाटते की उत्तर काशी माझी आहे. तेथील आपत्तिग्रस्त लोक माझे आहेत. हा भाव तुम्ही इतक्या लहान मुलांमध्ये सहजपणे निर्माण केलेला आहे’.
रा. स्व. संघाच्या शाखेमध्ये होणार्या संस्कारातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते. त्यामुळे बालासोरमध्ये ज्या वेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस कोणाच्याही सूचनेची, कोणाच्याही परवानगीची, आदेशाची अपेक्षा न करता स्वयंसेवक स्वतःहून तेथे मदतीकरिता पोहोचले. संघाचे संपूर्ण देशांमध्ये 50 हजारांपेक्षा अधिक सेवा कार्य चालतात. ज्या ज्या ठिकाणी सेवेची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी हे सेवा कार्य केले जातात. जिथे आरोग्याची आवश्यकता आहे, जिथे शिक्षणाची आवश्यकता आहे, जिथे संस्काराची आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी तशा तशा पद्धतीचे सेवा कार्य केले जाते. याची कुठेही प्रसार माध्यमांमध्ये किंवा समाज माध्यमांमध्ये प्रसिद्धी होत नाही. तरीही लाखो लोक हे कार्य आमचे आहे. हे राष्ट्रीय कार्य आहे. या भावनेने कार्य करीत असतात. त्यांच्या मनामध्ये भाव असतो तो म्हणजे ‘सेवा है यज्ञ कुंड समिधासम हम जले!’