सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार

    दिनांक :12-Jun-2023
Total Views |
मुंबई, 
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार (Sunil Tatkare) सुनील तटकरे यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी ही घोषणा केली. शरद पवार यांनी 10 जूनला पक्षाच्या कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करताना, तटकरे यांच्याकडे दोन राज्यांच्या पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली होती. आता पक्षाच्या खजिनदारपदाची जबाबदारी तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर देण्यात आली आहे.
 
Sunil Tatkare