मुलांची स्वप्ने आणि बालपण नका हिरावू...!

12 Jun 2023 08:08:08
जागतिक बाल कामगारविरोधी दिन
 
World Day Against Child Labour : समाजातील अनेक अनिष्ट प्रकारांपैकी बाल कामगारही आहे. परिस्थितीमुळे असहाय होऊन चिमुकल्या हाती जेव्हा जबाबदारी किंवा पैसे कमावण्यासाठी काम करण्याची वेळ येते, तेव्हा समाजातील प्रत्येक सज्ञान, जबाबदार व्यक्ती गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभी असते. कारण, समाजातील प्रत्येक चिमुकल्याला योग्य वयात योग्य त्या प्राथमिक सोयी-सुविधा मिळणे ही नैसर्गिक गरज असते. मात्र, जेव्हा स्वत:चे पोट भरण्याची विवंचना त्यांच्यासमोर उभी ठाकते, तेव्हा शिक्षण, सकस अन्न अशा सर्व गरजा दुय्यम ठरतात. नाईलाजाने या चिमुकल्या हातांना मजुरी किंवा अन्य कामांमध्ये स्वत:ला झोकून द्यावे लागते.
 
Child Labour
 
दरवर्षी 12 जून हा दिवस (World Day Against Child Labour) जगभरात जागतिक बालकामगार निषेध दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 20 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केली होती. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की, 14 वर्षाखालील मुलांना श्रम करू न देता, त्यांना सुशिक्षित करून पुढे जाण्यासाठी जागरूक करणे; जेणेकरून मुलांची स्वप्ने आणि बालपण हरवू नये.
 
 
या दिवशी (World Day Against Child Labour) जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी 12 जून या जागतिक दिनानिमित्त बालकामगारांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो. सरकार, नियोक्ते आणि कामगार संघटना, नागरी समाज तसेच जगभरातील लाखो लोकांना जागरूक केले जाते आणि त्यांच्या मदतीसाठी अनेक मोहिमा देखील चालवल्या जातात. अशी अनेक मुले आहेत, जी अगदी लहान वयातच आपले बालपण गमावून बसतात. 5 ते 17 वयोगटातील मुले अशा कामात गुंतलेली असतात ज्यामुळे त्यांचे सामान्य बालपण हिरावले जाते आणि ते शिक्षण आणि आरोग्यापासून दूर जातात.

Child Labour
 
विकसनशील देशात परिस्थिती वाईट
विकसनशील देशांची सरकारे सामाजिक सुरक्षा योजनांवर फारच कमी खर्च करतात. त्यामुळे (World Day Against Child Labour) जगातील 74 टक्के देशातील 90 टक्के मुलांना सामाजिक सुरक्षा कवच मिळत नाही. श्रीमंत देशांनी सामाजिक सुरक्षेला खूप प्राधान्य दिले आहे. गरीब देशांतील लसींबरोबरच कोरोनामुळे अत्यंत गरिबी आणि बालमजुरीमध्ये ढकलल्या जात असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी त्यांच्या मुलांच्या सामाजिक सुरक्षेसाठी बजेटमध्ये वाढ करून जागतिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था तयार करण्याच्या योजनेला भारत पाठिंबा देऊ शकतो.

Child Labour
हे काम बालमजुरी नाही
मुलांच्या किंवा किशोरवयीनांच्या आरोग्यावर (World Day Against Child Labour) आणि वैयक्तिक विकासावर परिणाम न करणारे काम बालमजुरी म्हणून गणले जात नाही, जसे की, शाळेच्या वेळेबाहेर किंवा शाळेच्या सुटीच्या वेळी कौटुंबिक व्यवसायात मदत करणे. यामुळे मुलाच्या विकासात मदत होते आणि त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. मोठे झाल्यावर समाजाचे उत्पादक सदस्य बनण्यास तयार असतात, तेदेखील बालमजुरीत मोडत नाहीत. मात्र, त्याव्यतिरिक्त कोणी काम करून घेत असेल तर, ते बालमजुरीत मोडते. असे आढळल्यास कायद्यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0