50 हजार शेतकर्‍यांना 70 कोटी रुपये मंजूर

आ. श्वेता महाले यांचा पाठपुरावा

    दिनांक :14-Jun-2023
Total Views |
चिखली,
चिखली आणि बुलडाणा तालुक्यातील पीक विम्याचा लाभच न मिळालेल्या शेतकर्‍यांना व नुकसान भरपाई देताना कंपनीच्या चुकीने तफावतची रक्कम नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आ. श्वेता महाले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली दि. 9 जून रोजी दिलेल्या पत्राद्वारे केली होती ही मागणी मान्य झाली असून राज्य शासनाने अश्या 50 हजार 238 शेतकर्‍यांना 70 कोटी रुपये मंजूर केले आहेत. (MLA Shweta Mahale) आ. श्वेता महाले यांच्या प्रयत्नातून 50 हजार शेतकर्‍यांना न्याय मिळाला आहे.
 
MLA Shweta Mahale
 
2022 - 2023 च्या खरीप हंगामात चिखली तालुक्यात 50 हजार 238 शेतकर्‍यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे विमा काढला होता. MLA Shweta Mahale  यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 25 हजार 382 व काढणी पश्चात नुकसानीमध्ये 22 हजार 73 असे एकूण 47 हजार 455 शेतकर्‍यांनी ऑनलाइन तक्रारी भारतीय कृषी विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या. स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या 25 हजार 382 ऑनलाइन तक्रारींपैकी 17 हजार 449 शेतकर्‍यांना 14. 21 कोटी रुपये व काढणीपश्चात नुकसानीचे 22 हजार 73 पैकी 6 हजार 866 शेतकर्‍यांना 16. 19 कोटी रुपये असे एकूण 24 हजार 315 शेतकर्‍यांना 30. 40 कोटी रुपये नुकसान भरपाई कंपनीने देऊ केली आहे.
 
 
तालुक्यातील अद्याप स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे 7 हजार 933 व काढणीपश्चात नुकसानीचे 15 हजार 207 अशी एकूण 23 हजार 140 शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शिवाय बुलडाणा तालुक्यात 2022 - 23 च्या खरीप हंगामात एकूण 35 हजार 506 शेतकर्‍यांनी MLA Shweta Mahale भारतीय कृषी विमा कंपनीकडे विमा काढला होता. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 35 हजार 192 व काढणी पश्चात नुकसानीमध्ये 6 हजार 737 असे एकूण 41 हजार 192 शेतकर्‍यांनी ऑनलाइन तक्रारी भारतीय कृषी विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे 35 हजार 192 ऑनलाइन तक्रारीपैकी 15 हजार 355 शेतकर्‍यांना 11 कोटी रूपये व काढणीपश्चात नुकसानीचे 6 हजार 737 पैकी 2 हजार 568 शेतकर्‍यांना 15 कोटी रुपये एकूण 17 हजार 932 शेतकर्‍यांना रुपये 15 कोटी नुकसान भरपाई कंपनीने दिली आहे.
 
 
चिखली तालुक्यामध्ये मौजे एकलारा, जांभरून व इतर गावांमध्ये शेतकर्‍यांनी पीक विमा काढला होता . MLA Shweta Mahale एकाच मंडळात एकाच वेळी लागून असलेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त गटात झालेल्या नुकसानीची एकाच वेळेत काढणी पश्चात नुकसानीची एकाच वेळी तक्रार करूनही काही शेतकर्‍यांना अत्यल्प तर काही शेतकर्‍यांना जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे.