जगदंबा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम

    दिनांक :15-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
जगदंबा कनिष्ट विज्ञान महाविद्यालय (Jagdamba College) मागील 15 वर्षापासून गुणवंत विद्यार्थी घडवत आहे. दरवर्षी 10 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत असतात. तसेच जेईई व निट सारख्या कठीण परिक्षेत सुद्धा यश मिळवित आहे. नुकत्याच मे 2023 मध्ये झालेल्या परिक्षेत विद्यार्थ्यांनी उतुंग भरारी मारली. यामध्ये प्रथम आयुश सुर्यवंशी 99.76 टक्के, व्दितीय अथर्व लोहारे 99.73 टक्के, तृतिय विदीत मोर 99.45 टक्के, चतुर्थ साई शितल वातीले 99.32 टक्के, पाचवी सानिका देशमुख 99.11 टक्के गुण घेत पहिल्या ‘टॉप टेन’ चे मानकरी झाले आहेत.
 
Jagdamba College
 
तसेच (Jagdamba College) आदित्य संजय पिंपरवार 98.69, आर्यन सुदर्शन ढोले 97.20, अमित संजय राऊत 97.20, वेदिका राऊत 98.77, गौरव दीपक गाडेकर 96.87, राधीका फसाटे 97, नंदन मुंधडा 96, पारस पाटील 94.58, ओवेस शेख 94, हर्षवर्धन अढाळ 92.67, ब्रिनेश यादव 91.82 तसेच 90 टक्केच्या वर जवळपास 15 विद्यार्थी आहेत. महाविद्यालयातील सुसज्ज संगणक कक्ष, भौतिक कक्ष, रसायन कक्ष, हवेशिर वर्ग असे सकारात्मक वातावरण महाविद्यालयामध्ये आहे. फिशरी, व्होकेशनलमध्ये कॉम्प्यूटर सायंस, इलेक्ट्रॉनिक्स आणि जनरल सायंस असे सर्वच अभ्यासक‘म महाविद्यालयामध्ये उपलब्ध असल्यामुळे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
 
 
सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा (Jagdamba College) जगदंबा कनिष्ट महाविद्यालयात घेण्यात आला. कार्यक‘माला उपस्थित संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले, प्राचार्य संजय हजारे, प्रा. डॉ. संतोश बोरकर, प्रा. राजेश शहाडे, प्रा. अंजली माटे, प्रा. जया खांडेकर, प्रा. वैष्णवी कोरटकर तसेच प्रवीण दुधाट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. लागलेल्या चांगल्या निकालामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.