शासकीय रुग्णालयात आईला मुलाकडून मारहाण

पुसदला सिजर झालेल्या पत्नीलाही मारहाण

    दिनांक :15-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
येथील सरकारी दवाखान्यामध्ये सोमवार, 12 जूनच्या रात्री 10.30 वाजता (Mother beaten) मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी आलेल्या मुलगा व जावयाने संगनमत करून जन्मदात्या आईला व पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर फायटर काढून पत्नीला डोळ्यावर मारून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली.
 
Mother beaten
 
मुलाविरोधात पुसद शहर पोलिस ठाण्यात (Mother beaten) आईने दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार, 13 जूनला दुपारी 3 वाजता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रेमा दीपक उंटवाल (वय 50, मुखरे चौक) यांच्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा राजेश दीपक उंटवाल (वय 21, महिला कॉलेजच्या मागे) व जावई शिवाजी मारोती थोरात (वय 22, लाखाळा जि. वाशीम) यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेमा यांना तीन मुली व एक मुलगा असून त्यांची सर्वात लहान मुलगी किरण हिला 12 जून रोजी 10 वाजता सरकारी दवाखान्यात मुलगा झाला. त्यामुळे त्या व त्यांची मोठी मुलगी दीपिका सकाळपासूनच किरणजवळ होत्या.
 
 
त्याच दिवशी रात्री 10 च्या दरम्यान या दवाखान्यात त्यांचा मुलगा राजेश व जावई शिवाजी संगनमत करून सोबत आले. त्यानंतर तुम्ही इथे दोघी काय करत आहात, असे म्हणून तिथून निघून जा असे सांगितले. (Mother beaten) त्यावेळी प्रेमा यांनी, मुलीचे सिझर झाले आहे, त्यामुळे आम्हा दोघी मायलेकींना राहावे लागले सांगितले. तरीदेखील मुलगा व जावयाने वाद निर्माण केला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी प्रेमा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
 
 
अशावेळी (Mother beaten) दीपिकाने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता शिवाजीने त्याच्या पत्नीच्या डाव्या कानावर त्याच्या हातातील फायटरने मारून जखमी केले. त्यामुळे ती रक्तबंबाळ होऊन खाली पडली. त्यानंतरही शिवाजीने त्याच्या पत्नीला उजव्या डोळ्यावर मारहाण केली. या मायलेकींना मुलगा व जावयाकडून जिवाने मारण्याची धमकीही यावेळी दिली गेली. घाबरलेल्या प्रेमाने शहर पोलिस ठाणे गाठून मुलगा व जावयाविरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.