तभा वृत्तसेवा
अमरावती,
Pandharpur Special Railway : विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणार्या भक्तांकरिता नागपूर आणि नया अमरावती स्थानकावरून विशेष रेल्वे सोडण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती.
अमरावती जिल्ह्यासाठी देण्यात आलेली विशेष रेल्वे ही नया अमरावती ऐवजी अमरावती स्थानकावरून सोडण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी आज सकाळी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. त्यासाठी त्यांनी नया अमरावती स्थानकावर जाण्यासाठी वारकर्यांना होणार्या त्रासाची माहिती दिली होती. त्यांची ही सूचना रेल्वेमंत्री , रेल्वे राज्यमंत्री, महाप्रंबधक यांनी ग्राह्य धरली असून 25 व 28 जून रोजी पंढरपुरला जाणारी विशेष रेल्वे आता नया अमरावती स्थानका ऐवजी अमरावती स्थानकावरून दुपारी 2.40 वाजता सुटणार आहे. तसे लेखी आदेश व सुधारीत वेळापत्रक रेल्वे विभागाने शनिवारी सांयकाळी जाहीर केले. वारकर्यांची पण हीच मागणी होती. ती मान्य केल्या बद्दल खा. नवनीत यांनी रेल मंत्र्यांचे आभार मानले आहे. (Pandharpur Special Railway)