गोंदियातून पंढरपूर यात्रेसाठी एसटीच्या 15 बसेस

18 Jun 2023 19:56:37
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
Pandharpur Yatra : पंढरपुरात 29 जून रोजी आषाढी एकादशीनिमित्त आपल्या आराध्य विठरायाचे दर्शन घेण्याकरिता लाखो वारकरी एकवटणार आहेत. त्या वाकर्‍यांच्या सेवेत जिल्ह्यातील 15 बसेस 21 जून रोजी रवाना होणार आहेत.
 
Pandharpur Yatra
 
जिल्ह्यातील हजारो भाविक आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्याकरिता पंढरपूरला जाणार आहेत. या भाविकांना त्रास होऊ नये याची शासनातर्फे विशेष काळजी घेतली जात आहे. यातंर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आगारांच्या माध्यमातून अतिरिक्त बसेस देखील सोडल्या जात आहेत. यातंर्गत गोंदिया आगाराच्या 10 व तिरोडा आगारातील 5 बसेस पंढरपूर यात्रेकरिता जाणार आहेत. या बसेसची विशेष दुरुस्ती करण्यात येत असून 21 जून रोजी सोडल्या जाणार आहे. (Pandharpur Yatra) 
 
Powered By Sangraha 9.0