अलंकार टॉकीज चौकाला सुमतीताई सुकळीकरांचे नाव

18 Jun 2023 09:13:43

alankar
 
नागपूर,
Alankar Talkies Chowk अलंकार टॉकीज चौकाला स्व. लोकमाता सुमतीताई सुकळीकरांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या भित्तिचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार, 18 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता अलंकार टॉकीज चौक (सेन्ट्रल मॉल) येथे होणार असून, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी महापौर कुंदाताई विजयकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागपुरातील सर्व लोकप्रतिनिधींची सुद्धा उपस्थिती राहील. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमाता सुमतीताई सुकळीकर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
 
 
सौजन्य : आशिष नाईक, संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0