शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मातृशक्ती मैदानात

- काळे चष्मे अन् काळेच कपडे

    दिनांक :19-Jun-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
Govt Medical College : शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी आता मातृशक्तीने मैदानात उडी घेतलेली असून मेडिकल कॉलेज करीता काळ्या पोशाख वर काळे चष्मे घालून महाविद्यालय महिला कृती समितीने अभिनव महिला मानवी साखळी व धरणे आंदोलन काल 18 रोजी डॉ. आंबेडकर चौक येथे केले.
  
Govt Medical College
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरणे आंदोलनाचा काल 21 वा दिवस होता. मेडिकल कॉलेजकरिता समिती द्वारा वेगवेगळे आंदोलनातून शासनाचे लक्ष या मागणीकडे वेधण्यात आले आहे. उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन, लाँग मार्च, बाजार पेठ बंद, एक दिवसीय धरणे आंदोलन, सचिव वैद्यकीय विभाग यांना निवेदन, लोटांगण आंदोलन, राज्यपालांची भेट आणि निवेदन, खा. श्रीकांत शिंदे यांना निवेदन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट, चर्चा आणि निवेदन, दैनंदिन धरणे आंदोलने, विरोधी पक्ष नेते शरद पवार ह्यांची भेट ,चर्चा आणि निवेदन देण्यात आले. परंतु, आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आता महिलांनी कंबर कसली आहे. विविध भागातून महिला एकत्रित होऊन आंदोलन करुन सरकारचे लक्ष केंद्रित करत आहेत. (Govt Medical College) 
 
 
धरणे आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीने अगोदरच जाहीर केले गेले होते की दर रविवारी काहीतरी वेगळ्या पद्धतीने महिलांनी संध्याकाळच्या वेळात प्रदर्शने करण्याचे आयोजिले होते. ह्या रविवारी महिलांनी प्रामुख्याने काळ्या साड्या, ड्रेस परिधान करून रात्री काळे चष्मे घालून धरणे दिले. महिलांनी काळ्या वेषात आंबेडकर चौक ते रूबा चौकापर्यंत मानवी महिला साखळी बनवली. त्यात पुरुषांचा पण सहभाग होता. शासकीय महाविद्यालय महिला कृती समिती हिंगणघाटतर्फे सीमा मेश्राम, सुचिता कांबळे, प्रमिला भोंगडे, विशाखा झांबरे, निता धोबे, मोना फुलझले, प्रतिमा तेलंग, विमल मून, श्रृती कांबळे, योजना वसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच रुपेश लाजुरकर, अरविंद संगोळे, सुरेंद्र बोरकर, श्याम इडपवार, वासुदेव पडवे, मजीद मुगल, प्रवीण उपासे, पांढरी कापसे, सतीश ढोबे, बेग यांनी सहभाग नोंदवला. (Govt Medical College)