मेष (Aries Rashi)
आजच्या दिवशी अडकलेले पैसे परत मिळणार आहे. जमीन- संपत्तीच्या व्यवहारांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी काही बाबतीत दुमत असल्यामुळं कामात मन रमण्याची शक्यता कमी आहे. काम आणि व्यवसायाच्या बाबतीत शत्रूवर मात करणं कठीण होणार आहे.
मिथुन (Gemini Rashi )
आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी एखादा नवा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय़ घ्यावा लागणार आहे. नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर, त्यात यश मिळू शकतं.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला असणार आहे.
सिंह (Leo Rashi )
आजच्या दिवशी जोडीदाराकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे. कामकाजाचा ताण प्रयत्न केल्यास कमी केला जाऊ शकतो
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. नोकरी बदलणे किंवा अतिरिक्त उत्पन्न याबद्दल विचार कऱण्यासाठी काळ चांगला आहे.
तूळ (Libra Rashi )
या राशीच्या व्यक्तींना अचानक फायदा होऊ शकतो. व्यवसाय किंवा कोणतीही कार्य हातात घेतली तर ते अर्धवट सोडू नका.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. वेळेवर सहकार्य नसल्यामुळे कामात अडचणी येऊ शकतात.
धनु (Sagittarius Rashi )
आजच्या दिवशी जुन्या समस्यांमधून मुक्तता मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली बातमी मिळणार आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी नियोजित कामांमध्ये लोकांचे अडथळे येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीतही सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
कुंभ (Aquarius Rashi )
आजच्या दिवशी कामात मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकणार आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत नवीन नियोजन करणं फायदेशीर ठरेल.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेलं असू शकतं. तसंच आज संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं.