उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच मणिपुरात हिंसाचार

    दिनांक :02-Jun-2023
Total Views |
-अधिकारांच्या मुद्यावरून संघर्ष उभा
 
इम्फाळ, 
मागील 3 मेपासून सुरू झालेला Manipur Violence मणिपुरातील हिंसाचार महिनाभराच्या कालावधीतही पूर्णपणे रोखण्यात सरकारला यश आलेले नाही. उच्च न्यायालयाने मैती समुदायाला आदिवासीचा दर्जा प्रदान केल्यानंतर राज्यात हिंसाचार भडकण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. न्यायालयाच्या निर्णयानंतर मैती अन्य समुदायाच्या निशाण्यावर आला आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात असतानाही 35 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना आपल्या घरातून परागंदा व्हावे लागले.
 
 
Manipur High Court
 
माहितीनुसार, मागील दिवसांत Manipur Violence  मणिपूर उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश एम. व्ही. मुरलीधरन यांनी आपल्या निर्णयात म्हटले होते की, राज्य सरकारने मैती समुदायाच्या मागणीवर सकारात्मक विचार करावा आणि चार महिन्यांच्या आत केंद्र सरकाला प्रस्ताव पाठवावा. या आदेशानंतर आदिवासी आणि गैरआदिवासींच्या अधिकारांच्या मुद्यावरून संघर्ष उभा राहिला. इंडिजिनियस ट्रायबल लीडर्स फोरम यांच्याकडून काढण्यात आलेली रॅली आणि बंद आंदोलनानंतर राज्यात हिंसा भडकली.
 
 
मैती कोण?
मैती हिंदू समुदायाचे असून, राज्यात बहुसंख्यक आहेत. सध्या ते केवळ इम्फाळ खोर्‍यातील वास्तव्यास बाध्य आहेत. कारण राज्यातील डोंगराळ, दुर्गम भागात मालमत्ता खरेदी करण्यावर आणि शेती व्यवसाय करण्यावर त्यांच्यावर कायदेशीर बंधने घालण्यात आली आहेत. या समुदायाची लोकसं‘या अंदाजे 53 टक्के असली तरी त्यांना 10 टक्के भूभागातच राहावे लागत आहे. दुसरीकडे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले कुकी आणि नागा समुदायाची लोकसं‘या 40 टक्के असून, ते 90 टक्के भूभागावर वास्तव्य करत आहेत.
 
 
अन्य कारणे
Manipur Violence  मणिपूर हिंसाचारासाठी उच्च न्यायालयाचा आदेश वा निर्णय कारणीभूत ठरला असला तरी अन्य काही कारणे सुद्धा पुढे आली आहेत. यात मु‘यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे कडक धोरण सुद्धा समाविष्ट आहे. सरकारने डोंगराळ भागातील अतिक‘मणावर जोरदार कारवाई केली असून, अफीम शेतीलाही लगाम लावला आहे. अफीमपासून मिळणारे उत्पन्न दहशतवादी संघटनांकडे वळते करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला होता. दरम्यान, मणिपुरात कुकी समुदायाने हिंसेला सुरुवात केल्याचा आरोप होत आहे. याशिवाय या समुदायातील राजकीय पक्षांच्या आमदार वा खासदाराने वेगळ्या राज्याची मागणी केली आहे. मात्र, त्याच वेळी प्राचीन भारतीय संस्कृतीला जोपासणारा मैती समुदाय राज्याचे तुकडे करण्याला विरोध करत आहे.