लक्ष्मी धान गिरणीवर राष्ट्रवादीची सत्ता

02 Jun 2023 19:11:45
तभा वृत्तसेवा 
अर्जुनी मोर, 
Lakshmi paddy mill : तालुक्यात सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी दि लक्ष्मी सहकारी भात गिरणीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग‘ेसने सत्ता प्रस्थापित केली असून अध्यक्षपदी भोजराम रहेले, उपाध्यक्षपदी राकेश लंजे यांची वर्णीलागली आहे.
  
Lakshmi paddy mill
 
दि लक्ष्मी सहकारी भात गिरणीची निवडणूक 20 मे रोजी घेण्यात आली. याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी झाली. कॉग‘ेस, राष्ट्रवादी काँग‘ेसने महाविकास आघाडीचे माध्यमातून निवडणूक लढविली होती. भाजपानेही निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. 13 संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉग‘ेेस व राष्ट्रवादी काँग‘ेस समर्थीत पॅनलचे प्रत्येकी सहा असे बारा उमेदवार निवडुन आले. भाजप पॅनेलचा एकमेव उमेदवार विजयी झाला. संस्थेवर महाविकास आघाडीचे निर्विवाद बहुमत प्रस्थापित झाले. गुरूवार 1 जून रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक कघेण्यात आली. महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणुक बिनविरोध होईल असा अंदाज बांधला गेला होता. मात्र ऐनवेळी कॉग‘ेस व राष्ट्रवादी मधे तळजोड होवु न शकल्याने मतदान घेण्यात आले. (Lakshmi paddy mill) 
 
 
अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे भोजराम रहेले, कॉग‘ेसतर्फे प्रमोद पाऊलझगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतर्फे राकेश लंजे, कॉग‘ेसतर्फे विनोद गहाणे यांनी नामनिर्देशन दाखल केले. भोजराम रहेले यांना 7 तर प्रमोद पाऊलझगडे यांना 5 मते मिळाली. राकेश लंजे यांना 7 तर विनोद गहाणे यांना 5 मते मिळाली. अध्यक्षपदी भोजराम रहेले तर उपाध्यक्षपदी राकेश लंजे हे राष्ट्रवादी काँग‘ेसचे उमेदवार निवडुन आले. कॉग‘ेस व राष्ट्रवादी काँग‘ेसचे सहा- सहा उमेदवार असताना कॉग‘ेस चा एक मतदार फितुर झाला. कॉग‘ेसच्या महिला संचालक मतदार यांनी ऐनवेळी मतदान प्रकि‘येतून माघार घेतल्याने व भाजपच्या एकमेव संचालकाने राष्ट्रवादी काँग‘ेसच्या उमेदवारांना मतदान केल्याने राष्ट्रवादी समर्थीत पॅनलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडुन आले. निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. (Lakshmi paddy mill) 
 
Powered By Sangraha 9.0