सुरतमधील योग दिनाचा कार्यक्रम गिनीज बुकमध्ये

- विक्रमी 1.53 लाख लोकांचा सहभाग

    दिनांक :21-Jun-2023
Total Views |
सुरत, 
Surat Yoga Day : गुजरातमधील सुरत येथे बुधवारी आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमाने एकाच ठिकाणी योग सत्रासाठी सर्वांत मोठ्या मेळाव्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. येथे 1.53 लाख लोकांनी एकाच ठिकाणी योगासने केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी या विक्रमाला दुजोरा देताना सांगितले की, (Surat Yoga Day) सूरतमधील योगसत्रात 1.53 लाख लोक सहभागी झाले होते. यापूर्वी राजस्थानातील कोटा शहरात जागतिक विक्रम झाला होता. येथे 2018 मधील कार्यक्रमात 1,00,984 लोक एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी योगसत्रात सहभागी झाले होते.
 
Surat Yoga Day
 
एकाच ठिकाणी आयोजित केलेल्या (Surat Yoga Day) योगसत्रात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्याबद्दल सुरत येथील योग दिनाच्या कार्यक्रमाचा समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोक या कार्यक्रमात सहभागी झाले आणि मागील विक्रम मोडण्यात आला, अशी माहिती गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिली.
 
xvsd
 
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Surat Yoga Day) सुरतच्या डुमास भागात राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. सुरतमधील योगसत्रासाठी राज्य सरकारने 1.25 लाख लोकांचे उद्दिष्ट ठेवले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला की, 1.50 लाखांपेक्षा जास्त लोक कार्यक्रमस्थळी होते, असे सुरत महापालिकेच्या आयुक्त शालिनी अग्रवाल यांनी सांगितले.