वाघाच्या कातडीसह दोन आरोपी ताब्यात

- नागपूर-भंडार वनविभागाची कार्यवाही

    दिनांक :21-Jun-2023
Total Views |
नागपूर, 
Tiger skin : वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांना कोठडीत दांबण्याची धडक मोहिम वनविभागाकडून सुरु आहे. आत्तापर्यंत नागपूरच नव्हे तर विदर्भातही वनकर्मचाèयांनी कारवाई करीत आरोपींसह वन्यजीवांचे अवयव जप्त केले आहे. अशीच एक कारवाई नागपूर-भंडारा वनविभागाच्या वतीने पवनी परिसरात करण्यात आली. वाघाच्या कातडीसह २ आरोपी ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले आहे.
 
Tiger skin
 
भंडारा जिल्ह्यातील पवनी वनपरिक्षेत्रात वाघाच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती नागपूर वनविभागास मिळाली. यानंतर नागपूर वनविभागाने विशेष पथक तयार करुन भंडारा वनविभागाच्या पथकासह सापळा रचला. त्यानुसार नियोजन करुन २१ जून रोजी सकाळी धाड टाकत वाघाची कातडी (Tiger skin) व २ आरोपी ताब्यात घेतले. या कारवाईत लांबीला ८२ सेमी. आणि रुंदीला ७९ सेमीं एवढी वाघाची एक कातडी आणि अ‍ॅक्टीव्हा दुचाकी जप्त करण्यात आली. सदर कारवाईत आरोपी अनुक्रमे चंद्रपूरचे निलेश गुजराथी, विकास बाथोली या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार वनगुन्हा नोंदविण्यात आला.
 
 
सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक(प्रा) नागपूरचे रमेश कुमार, उपवनसंरक्षक डॉ. भारत qसह हाडा, भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी दक्षता विभागाचे पी. जी. कोडापे, हिरालाल बारसगडे, प्रमोद वाडे, निलेश तवले, दिनेश पडवळ, आर एस पोरेते आदींनी केली. सदर प्रकरणात आणखी आरोपी गवसण्याची शक्यता असून पुढील तपास भंडाèयाचे स. वनसंरक्षक वाय. व्ही. नगुलवर करीत आहेत. (Tiger skin)