ब्रिटिशांपूर्वी मुघल नव्हे मराठेच भारताचे राज्यकर्ते

22 Jun 2023 17:39:07
दृष्टिक्षेप
- प्रो. भगवती प्रकाश शर्मा
इंग्रजांनी मुघलांकडून भारताची सत्ता हस्तगत केल्याचे अनेकदा सांगितले जाते. परंतु वस्तुस्थितीवरून असे दिसून येते की त्यांच्या आगमनापूर्वीच मुघलांची राजवट संपली होती आणि भारताच्या 25 लाख चौरस कि.मी. प्रदेशावर पेशव्यांच्या नेतृत्वाखालील हिंदवी स्वराज्याचे राज्य होते. दुसर्‍या इंग्रज-मराठा युद्धापर्यंत (1803) दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकत राहिला.
भारतात सत्ता मिळवण्यासाठी इंग्रजांना (Maratha Swarajya) शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांच्या सैन्यासोबत दिल्ली, गुजरात, माळवा, मध्य भारत, महाराष्ट्र आणि दख्खनच्या पठाराच्या मोठ्या भागात 150 हून अधिक ठिकाणी अनेक लढाया कराव्या लागल्या. 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणानंतर आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर, 1680 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर, पेशव्यांनी 1758-59 पर्यंत अटक ते कटक पर्यंत 2.5 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवला. हा भगवा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 1788 पासून 1803 च्या दुसर्‍या मराठा-इंग‘ज युद्धापर्यंत फडकवला गेला. हे 25 लाख चौरस किमी क्षेत्रफळ आपल्या आजच्या 32.87 लाख चौरस किमी क्षेत्रफळाच्या तीन चतुर्थांशपेक्षा जास्त होते.
मुघलाची प्रासंगिकता संपली होती.
 
Maratha Swarajya
 
1764 मध्ये बक्सरच्या लढाईत झालेल्या पराभवानंतर मुघलांनी इंग‘जांवर एकही गोळी झाडली नाही. बक्सरमध्ये, काशी नरेश बलवंत सिंग, बंगालचे नवाब मीर कासिम आणि अवधचे नवाब शुजाउद्दौला यांच्यासोबत मुघलांनीही युद्ध केले. बक्सरच्या लढाईतील पराभवानंतर मुघल सम्राट शाह आलमने इंग‘जांचा आश्रय घेतला. (Maratha Swarajya) शाह आलम द्वितीय यांना 1761 मध्ये मेजर केमाकने कैदी बनवले आणि 1765 पासून त्यांना ईस्ट इंडिया कंपनीने पेन्शनर बनवले. 1771 मध्ये दिल्लीवर मराठ्यांच्या दुसर्‍या विजयानंतर 1788 ते 1803 पर्यंत फक्त स्वराज्याचा भगवा ध्वज फडकत होता.
स्वातंत्र्याची शताब्दी
1720 मध्ये श्रीमंत बाजीराव पहिला (Maratha Swarajya) पेशवा झाल्यापासून ते 1819 मध्ये तिसरे इंग‘ज-मराठा युद्ध संपेपर्यंत अठरावे शतक हा मुघलांच्या संपूर्ण पराभवाचा आणि स्वराज्याच्या वर्चस्वाचा काळ होता. श्रीमंत बाजीराव 1720 मध्ये पेशवे झाल्यानंतर, त्यांनी मुघलांकडून गुजरात आणि माळवा जिंकला. बाजीरावांच्या नेतृत्वाखाली 1737 मध्ये दिल्लीवर विजय मिळविल्यामुळे मुघल सत्तेची प्रासंगिकताच संपुष्टात आली. 1757 मध्ये मराठा सैन्याने दिल्ली जिंकल्यापासून ते 1803 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यापर्यंतचा संपूर्ण काळ हा स्वराज्यातील मराठा सैन्याच्या उत्कर्षाचा काळ होता.
 
 
1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि विशेषतः 1720 मध्ये पेशवे (Maratha Swarajya) श्रीमंत बाजीराव यांच्या पेशवाईपासून मराठ्यांनी दिल्ली, गुजरात, माळवा, मध्य भारत, बंगाल, तिरुचिरापल्ली, पंजाब, काश्मीर आणि उत्तर पश्चिम येथे मुघल आणि अफगाणांचा पराभव करून स्वातंत्र्य प्रस्थापित केले. लाहोर, मुलतान, पेशावर, काश्मीर, पंजाब, उत्तर-पश्चिम प्रांत आणि अटक इत्यादी प्रांत मराठा सैन्याने अफगाण आक‘मक अहमद शाह अब्दालीकडून हिसकावून घेतले.
 
 
पंजाबमध्ये मराठे आणि शीख खांद्याला खांदा लावून लढले. 1752 मध्येच या (Maratha Swarajya) मराठा सैन्याने मुघल वजीर सफदरजंग याच्याशी तह करून, पंजाब, सिंध आणि दोआबच्या महसुलाचा चौथा हिस्सा गोळा करण्यास सुरुवात केली आणि अजमेर आणि आग्राची सुभेदारीही घेतली. मराठ्यांनी म्हैसूरची सल्तनत (हैदर-टिपू), अवधचा नवाब, हैदराबादचा निजाम तसेच बंगाल, सिंध, अरकोट आणि मदुराईच्या नवाबांनाही जिंकले होते. रोहिलखंडातील अफगाणी रोहिल्ला नजीब खान यालाही मराठा सैन्याने कैद करून स्वराज्यात सामील करून घेतले.
 
 
मराठ्यांनी त्याची मुक्तता केली नसती तर पानिपतच्या युद्धात पराभवाची एक टक्काही शक्यता नव्हती. कारण मुघल, रोहिल्ला आणि अवधच्या नवाबाच्या सैन्याने मागून हल्ला केल्यामुळे मराठा सैन्याचा पराभव झाला. अंतर्घातामुळे पानिपतच्या तिसर्‍या लढाईत पराभव झाल्यानंतरही, 1771 मध्ये तिसर्‍या दिल्लीच्या विजयानंतर त्यांनी 1788 ते 1803 पर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पुन्हा ताबा मिळवला.
 
 
1737 मध्ये दिल्लीच्या विजयाबरोबरच, (Maratha Swarajya) पेशवे श्रीमंत बाजीराव यांनी दूरदृष्टीने अवधचा नवाब, रोहिलखंडचा नजीब खान तसेच राजस्थान आणि पंजाबच्या राज्यकर्त्यांना स्वराज्याचा एक भाग बनविले होते. या सर्व राज्यकर्त्यांनी, स्वतंत्र राज्यकर्ते असल्याने, स्वराज्याच्या या महासंघाला त्यांच्या कर महसूलाचा दशमांश (सरदेशमुखी) किंवा एक चतुर्थांश (चौथ) कर देऊन पेशव्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. या संस्थानांतील राजांनाही पेशवा बाजीरावांनी पूर्ण मान दिला होता. जेव्हा बाजीराव ससैन्य मेवाडहून आपली सरदेशमुखी घेण्यासाठी उदयपूरला आले, तेव्हाही त्यांनी महाराणा जगतसिंग यांच्या बरोबरीच्या आसनावर बसण्याऐवजी, मेवाडच्या राजघराण्याला ‘हिंदू सूर्य’ असे संबोधून, त्यांच्या समोरच्या गालिच्यावर जमिनीवर बसणे पसंत केले.
 
 
पानिपतच्या युद्धात अब्दालीने इस्लाम स्वीकारल्यामुळे रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा नवाब आणि मुघलांनी मराठ्यांशी असलेली युती तोडली. मुघल सम्राट आलमगीर, ज्याला 1757 मध्ये अब्दालीने कैद केले होते, त्याला मराठा सैन्याने 17 ऑगस्ट 1757 रोजी दिल्लीच्या दुसर्‍या विजयाच्या वेळी मुक्त केले होते. दिल्लीवरील या विजयानंतर मराठा सेनापतींनी अंताजी माणकेश्वर यांना दिल्लीचा सर्वेसर्वा बनवले. त्यानंतर मल्हार राव आणि रघुनाथ राव यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडे सरकत 17 मार्च 1758 रोजी सरहिंद, 20 एप्रिल 1758 रोजी लाहोर, तसेच तुकोजी होळकर यांनी सिंधू ओलांडून अटक, मुलतान आणि पेशावरपर्यंत भगवा ध्वज फडकवला. दुर्दैवाने, या स्वराज्याच्या परिसंघातील उत्तर भारतातील संस्थानांनी पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण आक‘मकांविरुद्ध भागच घेतला नाही आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या सैन्याला पाठिंबा दिला नाही.
 
 
या महासंघामध्ये सुरुवातीपासून सहभागी असलेल्या शक्तींना (Maratha Swarajya) आधुनिक इतिहासकारांनी मराठा संघ म्हटले आहे. छत्रपती आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखाली इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड, धार-देवासचे पवार, बुंदेलखंडचे बुंदेले आदींनी सुरुवातीपासूनच लढ्यात भाग घेतला. वायव्येकडील विजयानंतर आणि 1760 मध्ये अब्दालीला अफगाणिस्तानातून हद्दपार केल्यानंतर पेशव्यांना दोन वर्षांचा अवधी मिळाला असता, तर तो स्वराज्याच्या या सुसंस्थापित युतीचे रूपांतर स्थिर संघात करू शकला असता.
 
 
पानिपतानंतर मराठ्यांचा उत्कर्ष
पानिपतच्या पराभवानंतर अब्दालीला हुसकावून लावण्यासाठी (Maratha Swarajya) बाळाजी बाजीराव प्रचंड सैन्यासह पानिपतकडे निघाले. त्यानंतर अब्दालीने 10 फेब्रुवारी 1761 रोजी पेशव्यांना पत्र लिहिले, की तुम्ही दिल्लीवर राज्य करा. मी परत जात आहे. पेशवे माधवराव द्वितीय महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी संपूर्ण उत्तर भारतात आपला प्रभाव पुन्हा मिळवला आणि रोहिलखंड पुन्हा जिंकला. त्यानंतर मराठ्यांना पुन्हा एकदा संपूर्ण भारतावर अधिकार मिळाला आणि त्यांनी मुघल सम्राट शाहआलम याला पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवून संपूर्ण भारतावर राज्य करण्यास सुरुवात केली. 1771 मध्ये दिल्लीवर मराठ्यांच्या तिसर्‍या विजयानंतर, 1788-1803 पर्यंत लाल किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकत राहिला. 1803 ते 1805 पर्यंत चाललेल्या दुसर्‍या इंग‘ज-मराठा युद्धानंतरच इंग‘जांना मराठ्यांकडून दिल्ली ताब्यात घेता आली.
 
 
पेशव्यांचे सैन्य इंग्रजांशी लढले
स्वराज्याच्या रक्षणासाठी 1775 ते 1819 पर्यंत तीन इंग‘ज-मराठा युद्धे (Maratha Swarajya) आणि 1843 ची ग्वाल्हेर मोहीम यात पेशवाईत स्वराज्य महासंघाच्या फोजांचा ब्रिटिशांशी निर्णायक संघर्ष झाला. मुघल सरकारने कंपनीचे दणदणीत स्वागत केले. सम्राट शाह आलम ईस्ट इंडिया कंपनीच्या फर्मानावर शिक्कामोर्तब करीत असे. खरे तर 1760 मध्येही दिल्लीवरील अफगाण आक‘मक अब्दालीचा हल्ला हाणून पाडून स्वराज्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ यांनी दिल्लीचे रक्षण केले होते. शहाजहान तिसर्‍याला दिल्लीच्या त‘तावरून बेदखल करून, शाह आलम द्वितीय यालाही मराठा सैन्याने सत्तेवर बसवले. तेव्हापासून ते 1772 पर्यंत ते मराठा सेनापती महादजी शिंदे यांच्या संरक्षणाखाली राहिले. इंग्रजांविरुद्ध पेशवाईत स्वराज्य सैन्याचे पहिले इंग‘ज-मराठा युद्ध 1775 ते 1782, दुसरे युद्ध 1803 ते 1805 आणि तिसरे युद्ध 1817 ते 1819 पर्यंत चालले. अशा रीतीने देशाच्या सर्व प्रमुख भागात स्वातंत्र्याच्या सर्व मोठ्या लढाया स्वराज्यातील पेशव्यांच्या मराठा फौजांनी लढवल्या. 1857 चा स्वातंत्र्यलढा मुघल सम्राट बहादूर शाह जफर ऐवजी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढला असता तर निकाल वेगळा लागला असता. 1771 मध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकल्यानंतर, मुघलांना देशातील सामरिक आणि राजकीय शक्ती केंद्रांचा अनुभव नव्हता. 11 ऑगस्ट 1757 रोजी दिल्लीवर मराठ्यांच्या दुसर्‍या विजयानंतर, संपूर्ण आणि अखंड भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रावर मराठा सत्तेचे नियंत्रण होते.
 
 
पानिपतच्या युद्धात स्वराज्य युतीच्या उत्तर भारतातील संस्थानांनी (Maratha Swarajya) मराठ्यांच्या या पेशव्यांच्या केंद्रीय सत्तेला पाठिंबा दिला असता, तर आज म्यानमारपासून अफगाणिस्तानपर्यंत अखंड भारत निर्माण झाला असता. जर युतीच्या भागीदार राज्यांनी त्यांच्या अन्न आणि लोकरीच्या कपड्यांच्या गरजाही पुरवल्या असत्या तर आज अखंड भारताची स्थिती राहिली असती. हा पुरवठा झाला असता तर 14 जानेवारी 1761 च्या कडाक्याच्या थंडीत स्वराज्यातील मराठा सैन्याला भुकेने व लोकरीच्या कपड्यांशिवाय लढावे लागले नसते. तेव्हाही संध्याकाळपूर्वी मराठा फौजा जिंकत होत्या. पण जसजसा हिवाळा वाढत गेला तसतसे त्याचे शौर्य कमी होत गेले, लढा ढिला होत गेला.
 
 
मराठ्यांच्या दातृत्वाची किंमत
पानिपतच्या तिसर्‍या लढाईच्या शेवटी, अफगाण सैन्य, मुघल, रोहिल्ला आणि अवधच्या नवाबाच्या सैनिकांनी लढाईनंतर राहिलेल्या सर्व मराठा सैनिक आणि नागरिकांची कत्तल केली होती. दुसरीकडे, पहिल्या इंग‘ज-मराठा युद्धात, (Maratha Swarajya) जानेवारी 1779 मध्ये वडगावच्या लढाईत इंग्रजांनी शरणागती पत्करल्यानंतर, स्वराज्य सैन्याने संपूर्ण बि‘टीश सैन्याला मुक्त केल्यामुळे त्यांना 15 फेब्रुवारी 1779 रोजी अहमदाबाद, 4 ऑगस्ट 1779 रोजी ग्वाल्हेर आणि 11 डिसेंबरला वसई ताब्यात घेता आली. बि‘टीश सैन्याची मुक्तता करण्यात आली नसती तर 1788 ते 1803 पर्यंत लाल किल्ल्यावर फडकणारा स्वराज्याचा भगवा ध्वज आजपर्यंत अबाधित राहू शकला असता.
 
 
अशा रीतीने इंग्रजांच्या आगमनापूर्वी देशातील बहुतांश भूभागावर पेशवाईत हिंदवी स्वराज्याच्या (Maratha Swarajya) महासंघाचे साम्राज्य होते. 1757 मध्ये दिल्लीवर मराठ्यांच्या दुसर्‍या विजयानंतर संपूर्ण देशात मुघल सत्ता जवळजवळ नाहीशी झाली होती. शिवाजीच्या बालपणात संपूर्ण दक्षिण भारतात विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर आणि दक्षिणेतील मुघल परगण्यांमध्ये सर्वत्र मुस्लिम राज्यकर्ते होते. 1674 मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर, 1680 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत दक्षिणेतील तीन राज्यांतील 6-7 लाख चौरस कि.मी. प्रदेशात स्वराज्याची स्थापना झाली. त्यानंतर भारतात इंग‘जांच्या आगमनापूर्वी पेशवाईत हिंदवी स्वराज्य महासंघाचे साम्राज्य हे वैध, कायदेशीर आणि वास्तविक प्रभावी राज्य होते.
 
Powered By Sangraha 9.0