अज्ञात समाजकंटकांचा शहरात धुमाकूळ

24 Jun 2023 19:48:49
- पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह

उमरखेड, 
मागील काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांकडून Umarkhed city शहरात मध्यरात्री जाळपोळीचे सत्र सुरू असून अद्याप त्याचा सुगावा लागत नसल्याने पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी सारडा पेट्रोल पंप येथे रात्री नगर पालिकेच्या आतील बाजूकडून पेटते टायर टाकून पेट्रोल पंप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ताबडतोब अग्निशमन गाडी आल्याने पुढील अनर्थ टळला. शहरातील पोस्ट ऑफिस येथे देखील विद्युत जनरेटर जाळण्याचा प्रयत्न झाला असून, स्टेट बँक कॉलनीतील विद्युत डीपी जाळण्यात आली होती.
 
 
Dhumakul
 
शुक्रवारी रात्री आंबेडकर पुतळ्याजवळील डीपी क्रमांक 4322635 हीदेखील मध्यरात्री टायर टाकून जाळण्यात आली. त्याच वेळी नगर पालिका आवारात असलेली कचरा गाडीसुद्धा जाळण्यात आली. ही घटना सारडा पेट्रोल पंपाजवळच झाल्यामुळे पुन्हा पेट्रोल पंप पेटण्याची स्थिती निर्माण झाली होती. या सर्व घटनांमुळे सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनापुढे या अज्ञात समाजकंटकाचा शोध घेणे कठीण परीक्षा झाली आहे. पोलिस रात्रगस्त सुरू असताना असे जाळपोळीचे प्रकार घडतातच कसे याबद्दल जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
आंबेडकर पुतळ्याजवळील जी डीपी मध्यरात्री जाळण्यात आली त्याच्यासमोर एक अतिक‘मित टिनाचे दुकान असून डीपी समोरच असे दुकान कसे काय ठेवल्या गेले नगर पालिका प्रशासनाने याबाबत कारवाई का केली नाही हे गुलदस्त्यात आहे. पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून या Umarkhed city अज्ञात समाजकंटकांचा शोध घ्यावा ही जनतेची अपेक्षा आहे. नगर पालिका प्रशासनानेही विद्युत रोहित्रापुढील अतिक्रमण लवकरात लवकर काढावे.
Powered By Sangraha 9.0