आषाढी यात्रा विशेष बससेवेचा आ. श्वेता महाले यांनी केला शुभारंभ

26 Jun 2023 20:40:06
चिखली, 
महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती आणि लोक परंपरा असलेल्या (Ashadhi Yatra) आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक जात असतात. चिखली शहर व तालुक्यातून देखील हजारो भाविक दरवर्षी नित्यनेमाने या यात्रेला जातात. या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी चिखली बस आगारातर्फे दरवर्षी विशेष बस फेर्‍यांची विशेष व्यवस्था करण्यात येते. यावर्षीच्या आषाढी यात्रा बस सेवेचा शुभारंभ (MLA Shweta Mahale) आ. श्वेता महाले यांच्या हस्ते दि. 26 जून रोजी करण्यात आला.
 
MLA Shweta Mahale
 
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाची दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे भव्य (Ashadhi Yatra) यात्रा भरत असते. या यात्रेनिमित्त चिखली आगारातर्फे प्रवाशांच्या सेवेसाठी 30 विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रसंगी आ. महाले यांनी चिखली ते पंढरपूर या गाडी बस गाडीचे पूजन करून चालक प्रतीक शेगोकार आणि वाहक सागर जाधव यांचा देखील सत्कार केला व बसमध्ये जाऊन यात्रे करून संवाद साधला व यात्रेसाठी निघालेल्या महिला पुरुष वारकर्‍यांना (MLA Shweta Mahale) आ. श्वेता महाले यांनी शुभेच्छा देत भावपूर्ण निरोप दिला.
 
 
राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारने महिला प्रवाशांसाठी 50 टक्के सवलत बस भाड्यामध्ये दिली यामुळे महिला प्रचंड संख्येने प्रवास करत आहेत याबद्दल (MLA Shweta Mahale) आ. श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात व नफ्यात देखील वाढ होत असल्याचे आ. महाले म्हणाल्या महिला प्रवाशांना देखील या निमित्ताने सुविधा मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, आगार व्यवस्थापक विनोद इलामे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, माजी नगरसेवक विजय नकवाल, सुदर्शन खरात, वीरेंद्र वानखेडे, युवराज भुसारे, सचिन कोकाटे, भारत दानवे, हरिभाऊ परिहार, नरेंद्र मोरवाल यांच्यासह एसटी महामंडळाचे जाधव, लामकाने, बांडे, सामळकर, सागर परदेशी, अविनाश वेंडोले, प्रशांत झाडगे, अरुण पडघान, संतोष ढोणे, बद्री महाले, महाडीक, इंगळे, मोरे, सचिन सुनगत, परशराम सुरडकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0