ट्रॅॅक्टर ट्रॉली कालव्यात उलटून चार मैत्रिणींचा मृत्यू

चौघींवर एकत्र अंत्यसंस्कार

    दिनांक :27-Jun-2023
Total Views |
सातारा, 
शेतातील काम संपवून कारंडवाडी येथील चार महिला (tractor trolley Accident) ट्रॅक्टरमधून घरी जात होत्या. यावेळी कालव्यात ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शोकसागरात बुडालेले कारंडवाडी गाव अद्याप सावरलेले नाही. या चारही महिलांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आला.
 
tractor trolley Accident
 
सातारा शहरापासून कारंडवाडी हे 8 ते 10 किलोमीटरवर गाव आहे. सुमारे एक हजार उंबरठा असून, (tractor trolley Accident) लोकसंख्या तीन ते चार हजार आहे. शेती व एमआयडीसी हे येथील लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. बहुतांशी पुरुष एमआयडीसीमध्ये तर महिला शेतीच्या कामासाठी जातात.
 
 
नेहमीप्रमाणे या चारही महिला शेतीच्या कामासाठी गुलाब माने यांच्या शेतात गेल्या होत्या. शेतात जाण्या-येण्याचा प्रवास माने आपल्या टॅक्टर ट्रॉलीमधून करीत होते. सायंकाळी नेहमीच्याच रस्त्यावरून घरी येत असताना (tractor trolley Accident) कालव्यावरील अरुंद पुलावरून जात असताना पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यावरून ट्रॉली घसरून कालव्यात पडली. त्यात अरुणा शंकर साळुंखे, लिलाबाई शिवाजी साळुंखे, सीताबाई निवृत्ती साळुंखे व उल्का भरत माने यांचा मृत्यू झाला यात एक महिला जखमी झाली होती. या चौघीही चांगल्या मैत्रिणी होत्या.