आठवड्याच्या शेवटी मान्सून केरळमध्ये

    दिनांक :03-Jun-2023
Total Views |
मुंबई, 
नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात् Monsoon in Kerala मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत, मालदीव, लक्षद्वीप क्षेत्र, संपूर्ण कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्वमध्य उपसागराच्या काही भागांमध्ये वाटचाल भारतीय हवामान विभागाने दिली. या आठवड्याच्या शेवटी मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. अन्यथा त्याचा पुढील प्रवास लांबण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
 
 
Monsoon in Kerala
 
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात 5 जून रोजी चक‘ीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पुढील 48 तासांत त्याच प्रदेशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या किनार्‍याजवळ पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर हे चक‘ीवादळाचे परिवहन मध्यवर्ती स्तरावर असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मात्र, Monsoon in Kerala मान्सूनचा सध्याचा वेग पाहता यंदा त्याला विलंब होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास त्याची गती आणखी संथ होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.