ब्रिक्स विस्तार अजूनही प्रगतिपथावर : एस. जयशंकर

03 Jun 2023 18:08:53
जोहान्सबर्ग, 
ब्रिक्स गटाचा विस्तार अजूनही प्रगतिपथावर आहे. पाच देशांच्या गटातील सदस्य सकारात्मक हेतूने व खुल्या मनाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. केपटाऊनमध्ये ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर S. Jaishankar एस. जयशंकर माध्यमांशी बोलत होते. गतवर्षी नेत्यांनी आपल्याला ब्रिक्समध्ये प्रवेशासाठी निकष व प्रक्रियाबाबत मार्गदर्शक तत्त्वे, मानके तयार करण्यास सांगितले होते. हे काम अजूनही प्रगतिपथावर आहे, असे जयशंकर म्हणाले.
 
 
S. Jaishankar
 
ब्रिक्सला अनेक पैलू आहेत. सध्याचे ब्रिक्स सदस्य एकमेकांसोबत कसे काम करीत आहे, हा त्याचा एक भाग आहे. ब्रिक्स नॉन-ब्रिक्स देशांना कसे सहभागी करून घेते हा त्याचा दुसरा भाग आहे, असे ते म्हणाले. आणि तिसरा भाग म्हणजे आपण संभाव्य ब्रिक्स विस्ताराकडे कसे पाहतो- त्यासाठी योग्य स्वरूप काय असेल यावरही आपल्याला काम करणे आवश्यक आहे, असेही S. Jaishankar जयशंकर म्हणाले.
 
 
S. Jaishankar जयशंकर यांच्या मताशी ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री मौरो व्हिएरा यांनी सहमती दर्शविली. ब्रिक्स हा एक ब्रॅण्ड आणि संपत्ती आहे, त्यामुळे आम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल, कारण ब्रिक्सने जगातील 40 टक्के लोकसं‘येचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची संपत्ती आहे. ब्रिक्सने स्थापनेपासून 15 वर्षांच्या काळात अनेक देशांचे लक्ष वेधून घेतले आहे, असे व्हिएरा म्हणाले.
Powered By Sangraha 9.0