स्वतःला समृद्ध करतानाइतर सदस्य राष्ट्रांना फसवले

04 Jun 2023 05:50:00
राष्ट्ररक्षा
2001 मध्ये जेव्हा चीन जागतिक व्यापार संघटनेत (WTO) सामील झाला तेव्हा त्याचा GDP 1.34 ट्रिलियन होता. जागतिक व्यापार संघटनेत सामील झाल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिटंन यांनी चीन लोकशाहीकडे वाटचाल करेल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र झाले उलट; Chinese Multi Domain War चीनने डब्ल्यूटीओच्या प्रत्येक नियमाचे उल्लंघन केले, जबरदस्तीने तंत्रज्ञान हस्तांतरण केले, बेकायदेशीर राज्य अनुदान दिले, परदेशी वस्तूंची चीनमध्ये आयात होऊ दिली नाही आणि चिनी फायद्यासाठी पुरवठा साखळी नियंत्रित केली. याचा परिणाम असा झाला की, चीनने स्वतःला समृद्ध करताना इतर सदस्य राष्ट्रांना फसवले.
 
 
china-multi-domain
 
 
पूर्व युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातले अनेक देश चीनवर आता पूर्णपणे अवलंबित झालेले आहेत आणि त्या त्या देशातील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा अंत झाला आहे. बहुतेक प्रगत देशातील कॉर्पोरेटनी आपले कारखाने चीनमध्ये नेऊन युरोप आणि अमेरिकेच्या पायावर कुर्‍हाड मारली होती. आता हा धोका लक्षात आल्यानंतर अनेक कारखाने, Chinese Multi Domain War चीनच्या बाहेर आपल्या स्वतःच्या देशात किंवा भारत किंवा एशियातील देशात परत येण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये यश मिळणे इतके सोपे नाही. कारण ते चिनी आर्थिक चक्रव्यूहामध्ये पूर्णपणे अडकलेले आहे. आज 18.32 ट्रिलियन डॉलर जीडीपीवर चीन जागतिक स्तरावर नंबर 2 ची आर्थिक शक्ती आहे. ग्लोबल फायर पॉवरनुसार, चीनकडे 3.14 दशलक्ष लष्करी कर्मचारी (सक्रिय 2 दशलक्ष), 4950 रणगाडे, 730 नौदलाची लढाऊ जहाजे (2 विमानवाहू जहाजे आणि 76 पाणबुड्यांसह) आणि 3166 विमाने (1199 लढाऊ) आहेत. युनायटेड स्टेट्स आणि रशियाच्या मागे जागतिक लष्करी शक्तींमध्ये ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत.
 
 
 
साम-दंड-भेदचा वापर करून टेक्नॉलॉजी महाशक्तीकडे वाटचाल
ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटने विविध देशांनी प्रगत तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीवर वर्षभराचा प्रकल्प हाती घेतला. ट्रॅक केलेल्या 44 पैकी 37 तंत्रज्ञानामध्ये चीन आघाडीवर आहे. या क्षेत्रांमध्ये समाविष्ट होते इलेक्ट्रिक बॅटरी, हायपरसोनिक्स आणि प्रगत रेडिओ-फ्रिक्वेंसी कम्युनिकेशन्स जसे की 5G आणि 6G B. चीनने जगातील 48.49 टक्के उच्च-प्रभाव संशोधन पेपर तयार केले. हे Chinese Multi Domain War हायपरसोनिक्स आणि अशा अनेक विषयांसह प्रगत विमान इंजिनमधील जगातील मोठ्या 10 संशोधन संस्थांपैकी सात चीनमध्ये आहेत. मात्र, चीन तिथपर्यंत कठोर परिश्रमाने पोहोचला नाही, तर साम-दंड-भेद याचा वापर करून चीन तंत्रज्ञानाची महाशक्ती बनत आहे. 2020 मध्ये एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी खुलासा केला- आम्ही आता 2,000 हून अधिक चोरी, घुसखोरी तपासत आहे; ज्याचा संबंध चिनी सरकारशी आहे. दर 10 तासांनी एक नवीन चिनी चोरी उघड होते. गेल्या काही वर्षांमध्ये चोरीची वाढ ही 1,300 टक्के आहे. चीनच्या मोठ्या प्रमाणावर बौद्धिक संपदा (IP) चोरीने अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे. चिनी आयपी चोरीमुळे युनायटेड स्टेट्स दरवर्षी 600 अब्ज गमावते.
 
 
महत्त्वाच्या नागरिकांची टेहाळणीसाठी अभिनव मार्ग
परदेशामध्ये महत्त्वाच्या नागरिकांवर पाळत ठेवून हेरगिरी करण्याकरिता चीनने अभिनव मार्ग शोधले आहेत. त्यापैकी एक म्हणजे चायनीज इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) मॉड्यूल. IoT चा वापर कृषी, उत्पादन, वाहतूक, CCTV इ. स्मार्ट उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. जानेवारी 2023 मध्ये, ब्रिटिश सरकारच्या अधिकार्‍यांनी एका चायनीज सेल्युलर IoT मॉड्यूलचा शोध लावला, जो वरिष्ठ मंत्री वापरत असलेल्या कारमध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस म्हणून वापरला जात होता. परदेशामध्ये महत्त्वाच्या नागरिकांवर हेरगिरी करण्याकरिता अशा मॉड्युल्समध्ये जवळपास काय चालले आहे ते ऐकणे, त्यांचे व्हिडीओ काढणे, महत्त्वाच्या व्यक्तींना ट्रॅक करणे, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे अशी माहिती गोळा केली जाते आणि ज्याचे विश्लेषण आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने चीनमध्ये केले जाते. यामुळे मोठा धोका निर्माण होत आहे. 2017 मध्ये फिटनेस ट्रॅकिंग अ‍ॅप स्ट्रावामुळे अमेरिकन गुप्तचर संस्थांमध्ये धोक्याची घंटा वाजली. यूएस सैनिकांनी व्यायाम करताना फिटबिटसारख्या फिटनेस ट्रॅकर्सचा वापर करताना त्यांच्या गुप्त यूएस सैन्य तळांचे स्थान चीनला दिले. रिअल-टाईम डेटा विश्लेषण क्षमता, बॅगेज-स्क्रीनिंग सिस्टम, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, चायनीज स्नूपिंग (टेहाळणी करण्याकरिता वापरली जाणारी साधने) लिस्ट फार मोठी आहे. आयात केलेल्या प्रत्येक चिनी इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे मॉड्यूल घातलेले आहे; ज्यामुळे चीनला या डिवाईसमधून माहिती मिळते. ही माहिती चोरी थांबवायची असेल तर एकच उपाय, Chinese Multi Domain War कुठलाही चिनी डिवाईस वापरू नये.
 
 
चिनी कुप्रसिद्ध ग्रेट फायरवॉल
आता चीनने केवळ चोरीच्या तंत्रज्ञानाने चिनी संपत्ती निर्माण केली नाही, त्याचा उपयोग चिनी जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही करीत आहे. प्रत्येक चिनी नागरिकांवर पाळत ठेवली जाते; ज्यामुळे यांचे लक्ष फक्त कामावर असेल, सरकारविरोधी कारवायांवर नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CCP) वर्चस्वासाठी इंटरनेटवरील माहितीचा मुक्त प्रवाह हा सर्वात मोठा धोका होता. म्हणून चीनने सिल्व्हर ओक चोरलेले सॉफ्टवेअर चिनी कुप्रसिद्ध ग्रेट फायरवॉल तयार करण्यासाठी वापरले. आपले सायबर योद्धे चिनी फायरवॉलमधून घुसखोरी करून चिनी नागरिकांना सत्य परिस्थिती सांगू शकतात का?
 
 
साखळी लॉजिस्टिक सिस्टिममध्ये एम्बेड केलेले IoT मॉड्यूल्स
Chinese Multi Domain War चिनी सीसीटीव्ही कॅमेरा हिक व्हिझन कंपनी भारतात सर्व ठिकाणी वापरली जाते. हिक व्हिझन आणि इतर सर्व चिनी कंपन्या चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांना बांधील आहेत; ज्यासाठी त्यांना चिनी सरकारच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. चिनी सरकारने सांगितलेले हेरगिरीचे काम त्यांना करावेच लागते आणि जी माहिती स्वतःच्या बिझिनेसमधून गोळा केलेली आहे, ती चिनी सरकारच्या बरोबर शेअर करावी लागते. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक सिस्टिममध्ये एम्बेड केलेले IoT मॉड्यूल्स भारतीय संरक्षण उत्पादकांच्या पुरवठा प्रवास कसा होतो, हे सांगू शकतात. म्हणजे महत्त्वाचे स्पेअर पार्ट्स कुठल्या कारखान्यांमध्ये तयार होतात, कुठल्या प्रकारच्या गाडीने, रोडने किंवा रेल्वेने त्यांना सैन्याच्या डेपोमध्ये पोहोचविले जातात आणि तिथून पुढे सीमेवरील सैन्याकडे कसे पोहोचवले जातात, अशी कुठल्याही महत्त्वाच्या उपकरणाची साखळीची वाटचाल जर समजली तर त्याचा वापर घातपात करण्याकरिता, ती साखळी तोडण्याकरिता पाहिजे त्यावेळेस केला जाऊ शकतो. चीन हिक व्हिझनसारख्या कंपन्यांच्या डेटाचा वापर करून स्पेअर पार्ट्स शस्त्रे प्रणाली वितरित केली गेली आहेत आणि कोणत्या भारतीय संरक्षण तळावर आहेत याचे चित्र तयार करू शकते. चायनीज गुप्तचर एजन्सीद्वारे अतिसंवेदनशील असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी डेटाचा वापर केला जाऊ शकतो. 2018 मध्ये चिनी हॅकर्सनी सरकारी गॅस कंपनी इंडेनच्या वेबसाईटद्वारे आधार डेटाबेसमध्ये घुसखोरी केली. त्यांनी नावे, पत्ते, फोटो, फोन नंबर, ई-मेल आयडी, बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन) आणि शेवटी बँक तपशिलांसह भारतीय नागरिकांचा डेटा चोरला, अशी बातमी आली होती. या चोरीमागे चिनी सरकार-समर्थित हॅकर्सचा हात आहे.
 
 
नेमके काय करावे?
मोठ्या संख्येने चिनी हेर नेपाळच्या सीमेवरून भारतामध्ये नापाक कारवाया करण्यासाठी येतात. कुठलीही चिनी नागरिकांना नेपाळ सीमेद्वारे भारतात प्रवेश करण्यापासून थांबवले पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या Chinese Multi Domain War चिनी सामग्रीचा वापर त्यामध्ये मोड्युस एम्बेड करून हेरगिरी करता केला जाऊ शकते. म्हणूनच कुठल्याही प्रकारची चिनी सामग्री भारतात येऊ देऊ नये .परंतु चीन आपली सामग्री केवळ चीनमधूनच पाठवतो असे नाही. चिनी सामग्री हाँगकाँग, सिंगापूर, साऊथ ईस्ट देश, नेपाळ यांच्या मार्गानेसुद्धा भारतामध्ये प्रवेश करीत असते. हे पूर्णपणे थांबले तरच देशावर तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारी हेरगिरी थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकते. आज कुठली चिनी सामग्री भारतामध्ये आहे आणि त्यामधून कशी हेरगिरी केले जाते आहे; त्याचे तज्ज्ञांकडून निरीक्षण करून घ्यावे आणि या सध्या भारतामध्ये असलेल्या मॉड्युल्स निष्क्रिय बनवले जावे.
 
ब्रिगेडियर हेमंत महाजन
9096701253
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
Powered By Sangraha 9.0